इंग्लंड - काहीही केलं, कितीही काळजी घेतली, कोरोनाला प्रतिबंध करायचा प्रयत्न केला, तरी कोरोना जगातून पूर्णपणे कधीच संपणार नाही. छोट्या प्रमाणात का होईना, कुठे ना कुठे तो अस्तित्वात राहीलच, असा इशारा खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला असताना कोरोनाचे संकट आणखी गहिरं झाले आहे.पण कोरोनाचा व्हायरस नेमका कोणावर मोठ्या प्रमाणात आक्रमण करतो आणि कोण अधिक संख्येनं त्याला बळी पडतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. कारण अशा लोकांना प्रथम संरक्षण दिलं तर ते वाचू शकतील हा त्यामगचा कयास.इंग्लंडमधील डॉक्टर आणि संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात त्यांना आढळून आलं आहे की, ज्यांना मधुमेह, म्हणजे डायबेटिसचा आजार आहे, अशा लोकांना कोेरोनाची लागण होण्याचा धोका सगळ्यात जास्त आहे. यासंदर्भात स्वत:च्या देशातील रुग्णांची आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या केसेस तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दर चार रुग्णांपैकी एक रुग्ण डायबेटिसचा पेशंट होता.यासाठी ३१ मार्च ते १२ मे या काळात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या २२,३३२ लोकांचा केसस्टडी त्यांनी केला. त्यावेळी संशोधकांना लक्षात आलं की, त्यातील ५,८७३ म्हणजे तब्बल २६ टक्के नागरिक डायबेटिसचे पहिल्या किंवा दुसऱ्या स्तरावरचे रुग्ण होते. इंग्लंडच्या इंटेन्सिव्ह केअर नॅशनल आॅडिट अॅण्ड रिसर्च सेंटरनं याबाबतचा अभ्यास केला.त्यांच्या अभ्यासानुसार, डायबेटिसच्या रुग्णांना कोरोनाचा धोका सर्वांत जास्त आहे. त्याचबरोबर आणखी कोणत्या आजाराच्या रुग्णांना कोरोनाची भीती आहे, ती आकडेवारीही त्यांनी जाहीर केली. त्यानुसार डिमेन्शिया, मेंदूचा आजार, स्मृतिभ्रंश असणाºया नागरिकांना कोरोनाचा धोका १८ टक्के, श्वासोच्छ्वास, दम्याचा विकार असणाऱ्यांना १५ टक्के, किडनीचा जुनाट आजार असणाºयांना १४ टक्के, तर हृदयविकार असणाºयांना हा धोकादहा टक्के असल्याचंही शास्त्रज्ञांना निरीक्षणातून आढळून आलं आहे. यासंदर्भात अजूनही संशोधन सुरू आहे. त्यानुसार आणखी अचूक माहिती हाती येईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या आजाराच्या रुग्णांनी स्वत:ची अधिक काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
coronavirus: चारपैकी एका मधुमेही व्यक्तीला कोरोनाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 4:15 AM