बँकॉकः थायलंडचा वादग्रस्त राजा व्हॅजिरालाँगकॉर्न ऊर्फ राम दशम कोरोना व्हायरसच्या संकटात जनतेला सोडून जर्मनीला निघून गेले आहेत. जर्मनीच्या आलिशान हॉटेलला त्यांनी आपला बालेकिल्ला बनवलं असून, स्वतःसोबत २० महिलांनाही आणलं आहे. त्यासुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहेत. तसेच ते नोकरांनाही सोबत घेऊन आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कुटुंबातील काही लोकांना परत पाठवलं असून, एका आलिशान हॉटेलमध्ये स्वतःला होम क्वारंटाइन केलं आहे.थायलंडच्या राजानं कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता आपल्या नोकरांसह सेवकांना जर्मनीच्या अल्पाइन रिसॉर्टमधल्या एका आलिशान हॉटेलमध्ये आयसोलेट केलं आहे. राजानं हॉटेल ग्रँड सोन्नेबिचलला पूर्णतः बुक केलं आहे. त्यासाठी त्यांनी तिथल्या जिल्हा परिषदेकडून विशेष परवानगीसुद्धा मिळवली आहे. राजा महा २०१६ला वडिलांच्या निधनानंतर राजगादीवर विराजमान झाले आहेत. २० महिलांना ठेवणार एका वेगळ्या कक्षातद वीकच्या वृत्तानुसार, थायलंडच्या ६७ वर्षीय राजानं त्या सर्व २० जणींना एका खोलीत किंवा कक्षात ठेवलं असून, तिथे जाण्यास कोणालाही परवानगी नाही. तसेच मोठ्या संख्येनं नोकरही तिकडेच राहत आहेत. विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता परिसरातील हॉटेल व गेस्ट हाऊस बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु जिल्हा परिषद म्हणते की, पाहुणे एकटेच असून, त्यांचासोबत एक वेगळा गट आहे, म्हणूनच त्यांना परवानगी देण्यात आली आहे.कोरोनाच्या संशयामुळे ११९ लोकांना परत पाठवलेराजाने आपल्या कुटुंबातील ११९ लोकांना थायलंडला परत पाठविले आहे, कारण त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. दरम्यान, या संकटात राजाने जर्मनीत पलायन केल्याबद्दल देशातील हजारो लोक संतप्त झाले आहेत. जनतेनं सोशल मीडियावरून राजावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. देशातील राजावर टीका केल्यास किंवा त्यांचा अवमान केल्याबद्दल १५ वर्षं तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. देशात आम्हाला अशा राजाची काय गरज आहे?, असा हॅशटॅगही सोशल मीडियावर आता ट्रेंड होऊ लागला आहे. जनता कोरोनाशी दोन हात करत असतानाच राजा देश सोडून जर्मनीला पळाल्यानं जनता भडकली आहे. थायलंडमध्ये आतापर्यंत १२४५ जण संक्रमित झाले आहेत. थायलंडचा राजा फेब्रुवारीपासून देशाच्या बाहेर आहे. राजगादीवर बसण्यापूर्वीच त्यांनी चौथं लग्न केलं होतं.
CoronaVirus: कोरोनामुळे संकटात प्रजा; देशाला वाऱ्यावर सोडून २० महिलांसह पळाला राजा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 5:29 PM