कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 160,784 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,332,471 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 600,006 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यां आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा सात लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 1,891 लोकांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 1,891 लोकांचा मृत्यू झाला असून हा मोठा आकडा आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 738,792 झाली असून आतापर्यंत 39,014 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची आकडेवारी जगात सर्वाधिक आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत गेला. नेमका हा व्हायरस आला कुठून? यावरुन अमेरिका आणि चीनमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा देताना सांगितले आहे की, जर कोरोना व्हायरस जाणुनबुजून पसरवण्यामागे चीनचा हात असेल तर त्याचे परिणाम भोगायला चीनने तयार व्हावं असं त्यांनी सांगितले आहे. कोविड 19 बाबत चीन माहिती लपवत असून यातील आकडेवारीची पारदर्शकता आणि अमेरिकेसोबत सुरुवातीच्या असहकार्यावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर ठरला देवदूत
Coronavirus : धोका वाढला! देशात एका दिवसात 2154 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 16,000 वर
Coronavirus : बापरे! भाजीवाल्याला कोरोनाची लागण, तब्बल 2,000 जण क्वारंटाईन
CoronaVirus: दिलासादायक! ४५ जिल्ह्यांमध्ये नवा रुग्ण नाही