वॉशिंग्टन : जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होण्यामागे कोणत्या देशाचा हात आहे, हे साऱ्या जगाला पडलेले कोडेच आहे. परंतू अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये खटके उडू लागले आहेत. कारणही तसेच आहे. अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजविला असून दिवसाला १०-१० हजार कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत आहेत. तर मृत्यूंचा आकडा हजारावर गेला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी हा चीनी व्हायरस असल्याची टीका केली होती. यावर चीनने आक्षेप नोंदविला होता. यानंतर ट्रम्पनी चीनलाच जबाबदार धरत वेळीच कोरोनाची माहिती दिली असती तर हा व्हायरस रोखता आला असता, असा आरोप केला होता. आज ट्रम्प यांनी थेट जागतिक आरोग्य संघटना WHO लाच लक्ष्य केले आहे. डब्लूएचओ चीनची खूप बाजू घेत आहे. जे कधीच योग्य नाहीय. जगातील लोक डब्लूएचओच्या वागण्यावरून नाराज आहेत. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविल्यावरून WHO चीनची स्तुती केली आहे. लोकांना हे चुकीचे वाटत आहे. WHO चीनचीच बाजू घेत सुटले आहे, अशी टीका ट्रम्प यांनी पत्रकारपरिषदेत केली आहे.
ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे जेव्हा WHO चे संचालक टेडरोस अधनोम हे चीनची बाजू घेतल्याने जगभराच्या लोकांच्या निशाण्यावर आहेत. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत २१ हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर या व्हायरसने १९६ देशांना विळखा घातला असून ४ लाखांहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत.
चीनने या व्हायसरचा प्रसार केल्याच्या आरोपावर बाजू मांडली आहे. हा व्हायसर चीनमध्ये सापडलेला असला तरीही त्याची निर्मिती चीनने केलेली नाही. तसेच हा व्हायरस चीनने जगभरात पसरवलेला नाही. यामुळे चीनी व्हायरस किंवा वुहान व्हायरस असे शब्दप्रयोग चुकीचे आहेत.
CoronaVirus: थँक्यू महिंद्रा! केवळ ४८ तासांत बनविले व्हेंटिलेटरचे प्रारूप; खर्च अवघा ७५०० रुपये
गुरुद्वारावर ISIS चा मोठा हल्ला; 27 शीखांचा गोळीबारात मृत्यू
चालता चालता चक्कर येऊन पडला; कोरोनाच्या भीतीमुळे रस्त्यावरच तडफडला
वैज्ञानिकांना दिसला आशेचा किरण; कोरोना व्हायरसनेच दिलीय मोठी संधी
भारत, अमेरिकेवर मंदीची टांगती तलवार; तरीही चीनसाठी 'मूड' चांगला