वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसच्या भीतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. मात्र, स्वत: कोरोना संक्रमित अधिकाऱ्यासोबत जेवण करूनही तपासणीस नकार दिला आहे. ट्रम्प यांच्यासोबत त्यावेळी हजर असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी मात्र स्वत:ला वेगळे करून घेतले असून त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची पत्नी सोफी, स्पेनचे मंत्री इरीन मोंटेरो, इराणच्या आरोग्य मंत्री इराज हरीर्शी, ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नडाईन डोरिस आणि ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डटन यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच जगभरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 5421वर पोहोचला आहे. तर जवळपास दीड लाखांच्य़ा आसपास संक्रमितांची संख्या आहे. डब्ल्यूएचओने युरोपला कोरोनाच्य़ा उद्रेकाचे नवे केंद्र घोषित केले आहे.
जगातील सर्वात सुरक्षित नेता म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखिल कोरोनाच्या सावटाखाली आले आहेत. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात एका ब्राझीलच्या अधिकाऱ्याची भेट घेतली होती. त्यांनी फ्लोरिडामध्ये मार-ए-लेगो रिसॉर्टमध्ये ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यासोबत जेवनही केले होते. यावेळी ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारोदेखील उपस्थित होते. या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अधिकाऱ्याचे नाव फैबियो वाजनगार्टन असे आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ट्रम्प यांच्यासोबत फोटोही पोस्ट केला होता. ब्राझीलमध्ये गेल्यानंतर वाजनगार्टन कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले आहे. तर बोल्सोनारो यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. याबाबत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसलाही कळविण्यात आले आहे.
अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित; युरोप बनला उद्रेकाचे केंद्र
आजचे राशीभविष्य - 14 मार्च 2020
मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उप राष्ट्राध्यक्ष पेन्स यांनी कोरोनाच्या चाचणीस नकार दिला आहे. मात्र, अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या अधिकाऱ्याशी जास्त संबंध आले नसल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.