वॉशिंग्टनः कोरोनाच्या संकटात अमेरिका आणि चीनमधलं शाब्दिक युद्ध प्रचंड भडकलं आहे. चिनी नेते अमेरिकेवर हल्लाबोल करत असतानाही अमेरिकेच्या नेतृत्वानंही त्याला सडेतोड उत्तर देणं सुरूच ठेवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील कोट्यवधी लोकांच्या मृत्यूसाठी चीनला जबाबदार धरलं होतं. आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. मी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून यावे, अशी चीनची इच्छा नाही. चीनला माझे विरोधक जो बिडेन यांना अध्यक्ष बनवायचे आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत हा हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, "चीनने सातत्यानं चुकीची माहिती पसरवणे सुरूच ठेवले आहे, कारण जो बिडेन यांना अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. जेणेकरून चीन पुन्हा एकदा अमेरिकेचा फायदा उचलून अमेरिकेला उद्ध्वस्त करू शकेल. हे बर्याच काळापासून तो करत आला आहे. पण मी आल्यापासून तो असे करण्यात अपयशी ठरला असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीची रंगत आतापासूनच सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्पही कोरोना विषाणूच्या साथीसाठी चीनला जबाबदार धरत आहेत. याआधीही चीनला डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने लक्ष्य केले आहे, कोरोना विषाणूमुळे होणा-या मृत्यूसाठी चीनला जबाबदार धरले आहे. सध्या मी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलणार नसल्याचंही त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गरज पडल्यास चीनशी असलेले चीनशी असलेले संबंधही तोडू, अशी धमकीही दिली होती.
हेही वाचा
एका कुटुंबाला कचऱ्यात सापडल्या दोन बॅगा अन् उघडून पाहतात तर काय...
CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका
CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'
Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत
CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा
CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत