शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

Coronavirus: ...आता परिणाम भोगायला तयार राहा, डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 1:20 PM

चीनच्या वुहान शहरातूनच या व्हायरसचा जगभरात प्रसार झाला आहे, याबाबत कोणतीही शंका नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. कोरोना व्हायरससंदर्भात जागतिक आरोग्य संघटना(WHO) आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची चीननं वारंवार फसवणूक केली आहे. चीननं या व्हायरससंदर्भात चुकीची माहिती दिल्यानंतर त्याचे पूर्ण जगाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. चीनच्या वुहान शहरातूनच या व्हायरसचा जगभरात प्रसार झाला आहे, याबाबत कोणतीही शंका नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.व्हाइट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं डोनाल्ड ट्रम्प यांना चीनसंदर्भात काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना त्यांनी चीनला थेट धमकीच देऊन टाकली आहे. चीनविरोधात आम्ही काय कारवाई करणार आहोत, हे येत्या काळात तुम्हाला समजेलच, परंतु ते आता उघडपणे सांगू शकत नाही, पण त्यांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं, असंही पत्रकाराला उद्देशून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.  रिपब्लिकन खासदारांची चीनविरोधात कारवाईची मागणीसिनेटर स्टिव्ह डेन्सने यांनी ट्रम्प यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. अमेरिकेनं चीनवर वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणांसाठी अवलंबून राहणं संपुष्टात आणलं पाहिजे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तत्पूर्वी ट्रम्प यांनी चीननं जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ)च्या माध्यमातून अमेरिकेचा फायदा उचलल्याचा आरोप केला होता. चीन निष्पक्षपणे वागला नाही, तर आम्ही त्यांना सोडणार नाही, अशी धमकीसुद्धा अमेरिकेनं दिली आहे. चीन 30 वर्षांपासून अमेरिकेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.  चीनवर ट्रम्प यांचा हल्लाबोलअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सतत कोरोना व्हायरसच्या संबंधीची माहिती लपवल्याचा आरोप केलेला आहे. या विषाणूसंदर्भात चीननं प्रारंभिक माहिती लपवल्यानं त्याचा जगाला परिणाम भोगावा लागत आहे. कोरोना व्हायरस हा चिनी व्हायरस असून, जग त्यांच्या चीनच्या कर्मांचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम भोगतो आहे. वेळेत माहिती दिली असती तर कोरोनाला चीनमध्येच रोखता आलं असतं, असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिका