नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी इस्राएलही प्रयोग करत असून, त्यात काही आशादायक निष्कर्ष हाती आले आहेत. ही लस शोधून काढण्यात यश आल्यास ती जगभरात सर्वांना उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही इस्राएलने दिली आहे.
कोरोना विषाणूला अटकाव करणारी अॅन्टीबॉडी अर्थात रोगप्रतिकारक घटक इस्राएलच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत, अशी घोषणा त्या देशाचे संरक्षणमंत्री नफताली बेनेट यांनी नुकतीच केली होती. त्याअनुषंगाने इस्राएलचे भारतातील राजदूत रॉन मल्का यांनी सांगितले, की कोरोना लशीबाबतचे इस्राएलचे प्रयोग आता पुढच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत.संकटसमयी भारत-इस्राएलमध्ये वाढती जवळीकया साथीमुळे जगातील अनेक देश संकटात सापडले असून, त्यातून बाहेर पडण्याकरिता ते परस्परांना सहकार्य करत आहेत. मल्का म्हणाले, की कोरोना साथीच्या संकटामुळे भारत व इस्राएल एकमेकांच्या आणखी जवळ आले आहेत. या विषाणूशी ते एकजुटीने मुकाबला करत आहेत.इस्राएलप्रमाणे अनेक देशांतही प्रतिबंधक लस तयार करण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. इटलीनेही अशा प्रयोगांत चांगले यश मिळविल्याचे वृत्त नुकतेच झळकले होते.