लंडनः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटत आहेत. कोरोनाचा केंद्रबिंदू चीनमधलं वुहान शहर असल्यानं अमेरिका वारंवार चीनवर हल्लाबोल करत आहे. आता अमेरिकेपाठोपाठ ब्रिटननंही चीनविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटननं चीनसोबत असलेल्या द्विपक्षीय संबंधांचा पुनर्विचार करावा, असं ब्रिटनच्या जनतेबरोबरच गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे. हायटेक आणि रणनीतिक उद्योगात चिनी गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ब्रिटिश कूटनीतीतज्ज्ञ आणि चीनमध्ये काम केलेले चार्ल्स पार्टन म्हणाले की, लंडन-बीजिंगच्या द्विपक्षीय संबंधावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण चीन या संधीला पश्चिमेकडच्या देशांसोबत प्रतिस्पर्धेच्या स्वरूपात पाहतो. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसनं आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गार्जियनच्या रिपोर्टनुसार, चीननं या महारोगराईपासून स्वतःचा जवळपास बचाव केलेला आहे आणि तो वन-पार्टी मॉडल तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या मंत्र्यांनी देशहिताचा विचार करायला हवा. तसेच चीनला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं याचा ब्रिटननं आता विचार करायला हवा. ब्रिटनसुद्धा डिजिटल कम्युनिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या चीनच्या हाय-टेक कंपन्यांवर प्रतिबंध लादू शकतो. तसेच त्यांच्या अनेक विद्यापीठांमध्ये असलेल्या चिनी विद्यार्थ्यांना बाहेरचाही रस्ता दाखवू शकतो.बोरिस जॉन्सन हेसुद्धा कोरोना व्हायरसनं संक्रमित असून, त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. चीन कोरोनानं त्यांच्या मृत्युमुखी पडलेले आणि संक्रमितांची आकडेवारी लपवत असल्याची माहिती ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी तिथल्या मंत्र्यांना दिलेली आहे. व्हाइस हाऊसपासूनही चीननं महत्त्वाची माहिती लपवलेली असून, आता व्हाइट हाऊस चीनच्या सर्वच बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. गृहमंत्री प्रीती पटेल, संरक्षण मंत्री बेन वॉलेस हेसुद्धा चीनकडे संशयास्पद नजरेने पाहतात. तर डेव्हिड कॅमेरून आणि जॉर्ज ऑस्बोर्न यांनी ब्रिटनमधली चीनच्या गुंतवणूक महत्त्वाची असल्याचं सांगितलं आहे.
Coronavirus: चीन विश्वासघातकी, द्विपक्षीय संबंधांचा फेरविचार करा; अमेरिकेपाठोपाठ इंग्लंडच्या जनतेनं उठवला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 11:58 AM