टोकियो : टोकियो व अन्यसात प्रांत वगळता जपानमधील उर्वरित प्रांतांमधून आपत्कालीन आणीबाणी हटविल्याची घोषणा जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी केली आहे. कोरोना साथीने घातलेल्या थैमानामुळे जपानमध्ये गेल्या ७ एप्रिल रोजी काही प्रांतांमध्ये आपत्कालीन आणीबाणी जाहीर करण्यात आली होती व नंतर ती संपूर्ण देशात लागू झाली होती. कोरोनाची साथ जपानमध्ये आता उतरणीला लागली असून, देशाची अर्थव्यवस्था सावरण्याकरिता तसेच उद्योगधंदे पुन्हा सुरू करण्यासाठी शिंझो अबे यांनी अनेक निर्बंध शिथिल केले. मात्र कोरोनाचा पुन्हा मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ नये म्हणून फिजिकल डिस्टन्सिंगसारख्यानिर्बंधांचे कडक पालन करण्यात येणार आहे. टोकियो व अन्य सात प्रांतांमध्ये कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही.
coronavirus: जपानमधील बहुतांश प्रांतांतील आपत्कालीन आणीबाणी हटविली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:17 AM