न्यू यॉर्क - अमेरिकेच्या न्यू यॉर्कमध्ये कोरोनाचे संक्रमण चीन नव्हे तर युरोपातून झाले. अमेरिकेतील कोरोनाचे केंद्र बनलेल्या न्यू यॉर्क शहरासंदर्भात करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. न्यू यॉर्क शहरात या व्हायरसने सर्वप्रथम यूरोपीयन प्रवाशाच्या माध्यमाने फेब्रुवारी महिन्यात प्रवेश केला. यानंतर हा व्हायरस संपूर्ण राज्यात पसरला आणि परिस्थिती बिघडत गेली. यावेळी अमेरिकेचे संपूर्ण लक्ष चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना रोखण्यावर होते.
एका वैज्ञानिकाने दावा केला आहे, की अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर तपासण्या होण्यापूर्वीच हा व्हायरस पसरायला सुरूवात झाली होती. एवढेच नाही, तर स्थानिक नमुन्यांमध्येही आतापर्यंत समोर आलेले अधिकांश नमुने हे युरोपशीच मिळते जुळते आहेत. हे संशोधन एनवाययू ग्रॉसमॅन स्कूल ऑफ मेडिसिनचे आनुवंश शास्त्राचे प्राध्यापक एड्रियाना हेग्यू यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. ते म्हणाले, या हा व्हायरसच्या चेनची माहिती मिळाल्याने यासंदर्भातील धोरण ठरवणाऱ्यांनाही फायदा होईल.
एड्रियाना हेग्यू म्हणाले, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोरोनाच्या स्थानिक नमुन्यांत अधिकांश नमुने हे युरोपीयन प्रवाशांचे आहेत. कारण, अमेरिकेचे संपूर्ण लक्ष हे चीनमधील प्रवासी रोखण्यावर होते. मात्र, संक्रमण यूरोपातून आले. पहिल्या कोरोनाग्रस्ताला कसल्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही. याचाच अर्थ तो आपल्या आसपासच्याच कुनाकडून तरी संक्रमित झाला होता. मात्र, यूरोपातून आलेल्या प्रवाशांनंतर परिस्थिती अधिक संवेदनशील झाली.
सुरुवातीला निमोनिया समजून करत राहिले उपचार -न्यू यॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर परिक्षण सुरू होण्यापूर्वी येथील डॉक्टर या आजारावर निमोनिया समजून उपचार करत राहिले, असे एड्रियाना हेग्यू यांनी म्हटले आहे. हेग्यू आणि त्यांच्या चमूने न्यू यॉर्कच्या तीन रुग्णालयातून 75 रुग्णांच्या नाकातून घेतलेल्या नुमुन्यांवर अभ्यास केले.
प्रत्येक रुतूमध्ये वेगळा असतो इन्फ्लूएंझा -हेग्यू यांच्यामते सर्व प्रकारचे जीव-जंतू काळानुसार बदलतात. मात्र, आरएनए व्हायरसमध्ये प्रत्येक काळात काहीना-काही त्रुटी दिसून येते. असेच एसएआरएस-सीओव्ही-2 संदर्भातही झाले. यामुळे एन्फ्लूएंझा व्हायरस प्रत्येक रुतूत भिन्न असतो आणि नव-नव्या लसींची आवश्यकता लागते.