वॉशिंग्टन : जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना साथीवरील प्रतिबंधक लस बनविण्यासाठी माणसांवरील चाचण्यांना अमेरिकेत सोमवारपासून सुरुवात झाली. या प्रयोगात सहभागी झालेल्यांपैकी पहिल्या व्यक्तीस ही लस टोचण्यात आली.सिएटलमधील कैसर परमनन्ट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना विषाणूच्या साथीवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी प्रयोग सुरू असून या प्रकल्पाला अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थने निधी दिला आहे. या प्रकल्पाची घोषणा अमेरिकी सरकारने केली नसल्याने त्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अधिकाºयाने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.कोरोना विषाणूच्या साथीवरील प्र्रतिबंधासाठी माणसांवर होणाºया प्रयोगात ४५ युवकांना ही लस टोचण्यात येणार आहे. या लसीमध्ये कोरोनाचे विषाणू नसल्यामुळे त्याची या युवकांना लागण होण्याची अजिबात शक्यता नाही. ती टोचल्यामुळे मानवी शरीरावर चिंताजनक दुष्परिणाम होत नाही असे आढळून आल्यानंतर या प्रयोगांची व्याप्ती वाढविण्यातकोरोनावर प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी सध्या प्रयोग सुरू आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकेतील इनोव्हिओ फार्मास्युटिकल्स कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लस बनवत असून त्यासाठी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या प्रयोगात सामील झालेल्या काही जणांना लवकरच ही लस टोचली जाणार आहे. असेच प्रयोग मिसुरी येथील कान्सास शहरातील चाचणी केंद्रात तसेच चीन, दक्षिण कोरियामध्येही सुरू आहेत. (वृत्तसंस्था)सर्वत्र वापरास एक-दीड वर्षकोणतीही प्रभावी लस बनविण्यात यश आले तरी त्यानंतर तिचा सार्वत्रिक वापर होण्यास एक ते दीड वर्षांचा कालावधी जावा लागतो, असे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसिज या संस्थेचे संचालक डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले. चीनमध्ये एचआयव्हीच्या औषधांची मात्रा कोरोना विषाणूवर लागू पडते, या दिशेने शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. त्याचप्रमाणे इबोलावर शोधलेले रेमडेसिव्हिर हे औषध कोरोनाला प्रतिबंध करण्यास उपयोगी ठरते का, याचे प्रयोग चीन व अमेरिकेतील नेब्रास्का मेडिकल सेंटरमध्ये सुरू आहेत.
Coronavirus : कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीसाठी माणसांवर प्रयोगास अमेरिकेत प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 6:24 AM