इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात जाऊन गेल्या महिन्यात लष्कराने लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र, इम्रान खान यांना जी भीती होती तेच घडू लागले आहे. लोकांवर उपासमारीची वेळ आली असून कोरोनापेक्षा सर्वाधिक बळी भुकेनेच जाण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलवर ही परिस्थिती दाखविताना एका व्यक्तीने त्याची परिस्थिती मांडली आहे. ''माझा मोठा परिवार आहे. चार पत्नी आणि २६ मुले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना खायला मिळत नाहीय. त्यांची भूक भागविण्यासाठी मी काही करू शकत नाहीय. सरकारने व्हायरस न पसरण्यासाठी लॉकडाऊनचे पाऊल उचलले आहे. पण पोटाला तर भूक लागते ना. आता मुलांना संध्याकाळी काय खायला घालू?'' असा प्रश्न विचारला आहे.
पाकिस्तानमध्ये कम्युनिटी संक्रमनाला सुरुवात झाली असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. डॉक्टर, नर्स आंदोलने करत आहेत. त्यांना पुरेशी वैद्यकीय उपकरणे, पीपीई किट मिळत नाहीत. यामुळे त्यांनी जर आम्हीच वाचलो नाही तर लोकांना कोण वाचवणार असा प्रश्न सरकारला विचारला आहे.
या मोठ्या कुटुंबाच्या व्यक्तीचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर टीका आणि मस्करी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तामध्ये 12,670 कोरोनाचे रुग्ण असून २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथील लॉकडाऊन ९ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.
आणखी वाचा...
युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला
CoronaVirus पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी राजवट? कोरोनाआडून इम्रान खानची 'विकेट' काढणार
किम जोंग उनचा मृत्यू की ब्रेन डेड? उद्या मोठ्या घोषणेची शक्यता
किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही क्रूर आहे बहीण किम यो जोंग
...बस खिडकी थोडीशी उघडी ठेवा; कोरोनाला संपवण्यासाठी सरकारचे आवाहन