कोरोना व्हायरसच्या महामारीसाठी अनेक देश चीनला जबाबदार मानत आहेत. काही देश तर व्हायरस मागे चीनचं काही षडयंत्र असल्याचं मानत आहेत. अमेरिकेने तर चीनला खुलेआम धमकी दिली आणि आता जर्मनीने चीनकडे थेट भलीमोठी भरपाईची मागितली आहे. म्हणजे कोरोनाचा जनक मानल्या जाणाऱ्या चीन मागे अनेक देश लागले आहेत.
अमेरिकेसोबतच अनेक यूरोपिय देश आहेत जे जर्मनीप्रमाणे चीनला कोरोना व्हायरस पसरण्यासाठी जबाबदार मानत आहेत. जर्मनीमध्ये आतापर्यंत साधारण दीड लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि इथे 4500 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोना प्रभावित देशांमध्ये अमेरिका, इटली स्पेन आणि फ्रान्सनंतर जर्मनी पाचव्या क्रमाकांवर आहे. म्हणजे इथेही मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानामुळे संतापलेल्या जर्मनीने चीनला हिशेब चुकता करण्यास सांगितले आहे.
किती झालं नुकसान?
जर्मनीने चीनला 149 बिलियन यूरोचं बिल पाठवलं आहे. जेणेकरून कोरोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई केली जावी. यात 27 बिलियन यूरो पर्यटनाचं नुकसान, 7.2 बिलियन यूरो सिने इंडस्ट्रीचं नुकसान, जर्मन एअरलाइन्स आणि लहान उद्योगांचं 50 बिलियन यूरो नुकसानाचं बिल चीनला पाठवण्यात आलं आहे.
म्हणजे जर्मनीने कोरोना व्हायरसमुळे झालेलं नुकसान मोजून दाखवलं आहे. सोबतच चीनला एक बिलही पाठवलं आहे. जर्मनीने बिल पाठवलं तर दुसरीकडे अमेरिका त्यांची एक टीम चीनमध्ये पाठवण्यासाठी तयार आहे.
रविवारी पत्रकार परिषद घेऊन डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, वुहानमधून कोरोनाची सुरूवात झाली आणि चीनबाबत आम्ही आनंदी नाही आहोत. अमेरिका याचा शोध घेत आहोत की, हा व्हायरस चीनच्या कोणत्या लॅबमध्ये तयार केलाय. यासाठी आम्हाला चीनला जायचं आहे आणि समजून घ्यायचंय की, नेमकं झालं काय.
याआधी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, जर चीन कोरोना व्हायरस पसरवण्यात जबाबदार आढळला तर याचे चीनला गंभीर परिणाम भोगावे लागतील. असं असलं तरी चीनकडून वेळोवेळी हे सांगितलं जात आहे की, हा व्हायरस तयार केलाच जाऊ शकत नाही.
दरम्यान, सध्या चीन सगळ्यांच्या नजरेत आहे. खासकरून युरोप आणि अमेरिकाच्या निशाण्यावर चीन आहे. इथे या व्हायरसने सर्वात जास्त थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनामुळे 1 लाख 65 हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. अशात आता चीन जगाच्या निशाण्यावर येत आहे.