शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

coronavirus: खोट्या माहितीविरोधात जागतिक अभियान! इंग्लंड, बीबीसी आणि जागतिक आरोग्य संघटनेचा संयुक्त उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 3:46 AM

इंग्लंड : सध्या जगभरात दोन गोष्टी अतिशय वेगानं पसरत आहेत. अर्थातच त्यातली पहिली गोष्ट आहे, ती म्हणजे कोरोना व्हायरस. या ...

इंग्लंडसध्या जगभरात दोन गोष्टी अतिशय वेगानं पसरत आहेत. अर्थातच त्यातली पहिली गोष्ट आहे, ती म्हणजे कोरोना व्हायरस. या व्हायरसला आटोक्यात ठेवण्यासाठी जगभरात प्रत्येक देश आटोकाट प्रयत्न करतो आहे. त्यात काही देशांना आता हळूहळू यश येतंय. कोरोनाच्या या वेगाला तर आता हळूहळू अटकाव बसतोय; पण कोरोनाच्या चुकीच्या बातमी, त्याबद्दलची खोटी माहिती, सोशल मीडियावरून क्षणार्धात व्हायरल होणारा अर्धवट, काही वेळा बनावट तपशील, याचा प्रचार आणि प्रसार मात्र खूपच झपाट्यानं होतोय.कोणीही, काहीही ऐकलं, पाहिलं, त्याच्या पुढ्यात आलं, की पुढे, दुसऱ्याकडे ढकलण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, असं करताना आपण पुढे सरकवत असलेली ही माहिती खरंच योग्य, खरी आहे की नाही, याची कोणीच खातरजमा केलेली नसते. कोरोनाबाबतच्या या फेक न्यूजमुळेही अनेक देश आणि आरोग्य संघटना चिंतेत आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्याचे उपाय, तर सुरूच आहेत; पण इंग्लंडनं आता त्याच्याच जोडीनं कोरोनाच्या खोट्या, चुकीच्या प्रसारालाही प्राधान्यानं प्रतिबंध घालायचं ठरविलं आहे. इंग्लंडनं या नव्या लढाईत आपले अधिकृत राष्ट्रीय प्रसारण ‘बीबीसी’लाही सामील करून घेतले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही त्यासाठी आपला हात पुढे केला आहे. आता हे तिघे मिळून कोरोनाच्या खोट्या प्रचाराविरुद्ध खरी लढाई लढणार आहेत.कोरोनाबाबतच्या चुकीच्या आणि खोट्या माहितीविरुद्ध या तिघांनी मिळून ‘स्टॉप द स्प्रेड’ हे अभियान राबवायला सुरुवात केली आहे.सध्या जी जी खरी-खोटी, चुकीची माहिती बाहेर येते आहे, त्यावर या तिघांकडूनही ‘डबल चेक’ ठेवला जाताना त्यांची शहानिशा केली जाईल आणि त्यानुसार बीबीसीची चॅनेल्स, वेबसाईट्स आणि अ‍ॅप्सवरून त्याचे प्रसारण केले जाईल. ज्या ज्या अविश्वसनीय स्रोतांकडून माहिती बाहेर येईल, त्यावरही आता त्यांची नजर असणार आहे.यासंदर्भात इंग्लंड सरकार, बीबीसी आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी संयुक्त निवेदनही प्रसारित केले आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी इंग्लंड सरकार अर्थसाहाय्य पुरवत आहे. हा उपक्रम खरोखरच लोकांपर्यंत पोहोचतो आहे की नाही, लोक ‘कोरोना साक्षर’ होत आहेत की नाहीत, याची तपासणीही या मोहिमेतून केली जाणार आहे. अर्थातच हा उपक्रम त्यांनी फक्त आपल्या देशापुरताच ठेवलेला नाही. इतर देशांनाही ही माहिती पुरविली जाणार असून, त्याचं भाषांतर करण्यासाठी, त्याचबरोबर यासंदर्भातलं टुलकिट पुरविण्यासाठीही मदत केली जाणार आहे. ज्या ज्या देशांना हे टुलकिट हवे आहे, त्यांना ते पुरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनाच्या आधी कोरोनाच्या खोट्या वृत्तांना आळा घालण्याचं आवाहनही या त्रिपक्षीय सदस्यांनी केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीय