मेलबर्न - कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी जगातील काही देशांचं कौतुक होत आहे. मात्र काही देशांच्या नाकर्तेपणावर टीका होत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने बनवलेला क्वारेंटाइन प्रोग्रॅमच भयानक संटक ठरला आहे. आता या संदर्भात तपास सुरू झाला आहे. या सनावणीदरम्यान ,हा क्वरेंटाइन प्रोग्रॅम ७६८ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच क्वारेंटाइन प्रोग्रॅममधील गंभीर त्रुटींमुळे सुमारे १८ हजार जणांना संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे.डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार हॉटेलमध्ये सुरू करण्यात आलेल्या क्वारेंटाइन प्रोग्रॅमचा मूळ हेतू पूर्ण होऊ शकलेला नाही. यामध्ये काही समस्या दिसून आल्या आहेत. त्या म्हणजे प्रोटेक्टिव्ह गिअरचा योग्य वापर केला गेला नाही. स्टाफला योग्य प्रकारे प्रशिक्षण दिलं गेलं नाही. सोशल डिस्टंसिंगचं पूर्णपणे पालन करण्यात आलं नाही.क्वारेंटाइन प्रोग्रॅम हा कथितपणे संकट बनल्याने ऑस्ट्रेलियामधील विरोधी पक्षनेते मायकल ओ्ब्रायन यांनी व्हिक्टोरियाचे प्रीमियर डेनियल मायकल अँड्र्यूज यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. हॉटेलच्या क्वारेंटाइन प्रोग्रॅममुळे मेलबर्नमध्ये कोरोनाची दुसरील लाट आल्याचा आरोप केला जात आहे.विरोधी पक्षनेते मायकल ओब्रायन यांनी सांगितले की, व्हिक्टोरियाच्या पब्लिक अॅ़डमिनिस्ट्रेशनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चूक आहे. त्यांनी सांगितले की, मृत्यू आणि अन्य नुकसानीचा काही अर्थ असेल तर त्यासाठी जबाबदार व्यक्तींनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. तसेच तपास समितीसमोर हजर झालेले वकील बेन इहले यांनी सांगितले की, सरकारने सिस्टिम घाईगडबडीत तयार केला आणि त्यावर देखरेख ठेवण्यात अपयशी ठरले.यापूर्वी आरोग्यमंत्री जेन्नी मिकाकोस यांनी शनिवारी राजीनामा दिला होता. त्यांनाच क्वारेंटाइन प्रोग्रॅमसाठी जबाबदार ठरवले जात आहे. अव्यवस्था असलेल्या हॉटेल क्वारेंटाइनमुळे मे महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाला. तसेच या भागातील ९० टक्के बाधितांचा संबंध हा क्वारेंटाइन प्रोग्रॅ्मशी कथितपणे होता, असे सांगण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...
आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी
पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे