जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 190,654 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 27 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 745,620 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दुबईमध्ये एका भारतीयाचामृत्यू झाला. वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह हा जवळपास तासभर रुग्णवाहिकेमध्ये स्मशानभूमीसमोर ठेवला होता. त्याला शेवटाचा निरोप देण्यासाठी कोणीतरी येईल असं त्यांना वाटत होतं. मात्र बराच वेळ झाला तरी कोणीचं आलं नाही म्हणून शेवटी कर्मचाऱ्यांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिराती आणि इतर श्रीमंत आखाती देशांमध्ये हजारो भारतीय काम करतात. कामानिमित्त गेलेले अनेक जण तिथेच अडकून राहीले आहेत. याच दरम्यान कोरोनामुळे एका भारतीयाचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांन यासंबंधी माहिती देण्यात आली. मात्र कोणीच आलं नाही. वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये स्मशानाबाहेर ठेवला होता. पण त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी, अंत्यसंस्कारासाठी कोणीच आलं नसल्याने त्यांनीच अंत्यसंस्कार केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'संपूर्ण जग बदलत आहे. कोरोनाच्या भीतीने आता कोणीही येत नाही, कोणीही नातेवाईकांच्या मृतदेहांना स्पर्श करत नाही, शेवटचा निरोपही द्यायला येत नाही' अशी माहिती स्मशानभूमीचे व्यवस्थापक ईश्वर कुमार यांनी दिली आहे. आखाती देशांमध्ये आत्तापर्यंत 166 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 26 हजार 600 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत नोंदवलेल्या घटनांपैकी बहुतांश लोक परदेशी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यापैकी बहुतेक भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि फिलिपिन्स सारख्या आशियाई देशातील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...म्हणून आमदाराने धरले डॉक्टरचे पाय, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये पाणी टंचाई, विद्यार्थ्यांनी 4 दिवसांत खोदली विहीर
Coronavirus : आनंदाची बातमी! आणखी एक राज्य कोरोनामुक्त, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण
Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू