शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

coronavirus :हिडन  हंगर -जर्मनीत गरजूंसाठी रस्त्यावर जेव्हा अन्न थैल्या टांगल्या जातात..  

By meghana.dhoke | Published: April 21, 2020 3:52 PM

पोट भरायचं तर लाज सोडाव लागेल, आणि मन मारावं लागेल अशा टप्प्यावर उभी ‘हिडन हंगर’ अर्थात दडलेली भूक

ठळक मुद्देभूकेल्यांसाठी रस्त्याकडेला अन्नथैल्या, फुड बॅँक

सध्या जगभर एक चर्चा आहे की, कोरोना काळात भूकबळी जाता कामा नये.आपल्या देशातही लोक अन्नछत्र उघडत आहेत, भूकेल्यांर्पयत अन्न पोहचवत आहेत. काहीजण आपण किती उदार-दानशूर म्हणून केलेल्या अन्नदानाचे फोटो सोशल मीडीयात पोस्ट करत आहेत.मात्र यासा:यात समाधान इतकंच की, कुणी उपाशी राहू नये याची कळकळ जगभर माणसांमध्ये दिसते.मात्र यासा:यात एक चर्चा अशीही आहे की, हा कोरोना माणसांना दारिद्रय रेषेखाली ढकलून जाईल. मध्यम-कनिष्टमध्यमवर्गिय माणसं संकोच करतात कुणाकडून काही घेण्यात. मात्र ही आपत्ती अशी आहे की, त्यापैकी अनेकजण हा संकोच सोडून अन्नासाठी रांगेत उभे राहतील.मागास आणि विकसनशिल देशांतच नाही तर स्वत:ला श्रीमंत, विकसीत म्हणवणा:या देशांतही हे चित्र आता आम होऊ लागलं आहे.काही दिवसांपूर्वीच जर्मनीतला एक फोटो कुणी टिवट केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. रस्त्याच्या कडेला, कपांऊंडवर अन्नाच्या प्लास्टिक पिशव्या टांगलेल्या आहेत.

कुणी जमेल तसं तिथं ठेवून जातं, कुणी हवं ते घेऊन जातं. ना कुणाला दिल्याचा अहंगंड, ना कुणाला घेण्याचा संकोच किंवा न्यूनगंड. त्याचं कौतूकही झालं. विशेषत: आशियाई देशांत राहणा:या माणसांनी या देण्या-घेण्याच्या कृतीचं खूप कौतुक केलं कारण ‘दाता’ आपल्याकडे देण्यापेक्षा मोठा होता हा अनुभव सगळ्यांचा आहे.मात्र असं असलं तरी जर्मनीतही ‘हिडन हंगर’ अशी चर्चा आहेच.म्हणजे वरकरणी भूक दिसत नाही, मात्र एक वर्ग असा आहे ज्याला आपल्या दोनवेळच्या जेवणाची चिंता आहेच.ती आजच नाही तर कोरोनापूर्वीच्या काळातही होती, मात्र आता कोरोनाकाळात तिनं पुन्हा उघड डोकं वर काढलं आहे.जर्मनीत फूड बॅँक आहेत. त्याला जर्मन भाषेत ‘ताफेल’ म्हणतात.सा:या जर्मनीत मिळून सुमारे 93क् फुड बॅँक आहेत. लोक आपलं राहिलेलं अन्न तिथं देतात, फूड बॅँकसाठी पैसे देतात आणि ज्यांना गरज आहे ते त्या बॅँकेतून अन्न घेऊन जातात.साधारण कोरोना पूर्व काळात 15 लाख लोकांनाया फुड बॅँकेचा आधार होता.आता नवीन आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र ती संख्या वाढली असण्याची शक्यता आहे.याशिवाय या रस्त्याकडेला टांगलेल्या अन्न पिशव्यांची संख्याही बोलकी आहेत.त्यात माणसांनासाठीचेच अन्न पदार्थ, नाहीतर डॉगफुड, औषधं, काही फळं असंही अनेकजण ठेवून जात आहेत.एका वृत्तपत्रला दिलेल्या मुलाखतीत 46 वर्षाची  लीलीफर कुस सांगते, मी दर गुरुवारी ताफेलला जाऊन अन्न आणते. मी पाच दिवस नोकरी करते एका कसाईखान्यात, पण माझं भागत नाही. मग मी गुपचूप जाते. माङया सहका:यांना, मित्रंना हे माहिती नाही. कळलं तर ते त्याची गावभर चर्चा करतील अशी मला भिती वाटते. ओशाळवाणं वाटतं. पण भागत नाही तर काय करु, मी अन्न चोरत नाही, मागत नाही. तिथं उपलब्ध आहे मी घेऊन येते, यात वाईट ते काय?’लीलीफर सारखे नोकरदार आता वाढले असतील अशी शंका आहे, जे गुपचूप आपल्या गरजा भागवत आहेत, कारण संकोच. लीलीफर एकल माता आहे, घटस्फोटानंतर स्वत:च्या चार मुलांना ती एकटीनं सांभाळते आहे. ती सांगतेच, ‘ लाज बाळगून पोट कसं भरेल?’जर्मनीतलं हे चित्र आहे.सारं जग यादिशेनं जाईल असं भय आहे. झाकपाक तरी किती काळ करणार, कोरोनानं सारंच आणि सा:यांनाच उघडं पाडलं आहे.