शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

Coronavirus in China: कोरोना नव्हे, चीनमधील जनतेला 'या' गोष्टीचं टेन्शन, शांघायमधील परिस्थिती पाहून बीजिंगवासिय धास्तावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 10:32 AM

चीनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. कोरोनामुळे सर्वात आधी प्रभावित झालेला चीन आता या महामारीमधून सर्वात शेवटी बाहेर पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बीजिंग-

चीनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. कोरोनामुळे सर्वात आधी प्रभावित झालेला चीन आता या महामारीमधून सर्वात शेवटी बाहेर पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना कमी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी झिरो कोविड धोरण लागू केले आहे. हे धोरण कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी असले तरी आता ते चिनी नागरिकांसाठी क्रूरतेचा कळस ठरताना दिसत आहे. चीनच्या शांघायमध्ये सध्या परिस्थिती अशी झालीय की आता लोकांना कोरोनापेक्षा लॉकडाऊनच्या नियमांचीच जास्त भीती वाटत आहे.

शांघाय गेल्या अनेक आठवड्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. जनतेकडील अन्नधान्य संपत चाललं आहे आणि सरकारकडून दिलं जाणारे अन्न पुरेसं नाही. बीजिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली जात आहे जेणेकरून शांघायसारखे लॉकडाऊन होऊ नये. Guanzhou मध्ये फक्त एक संशयित रुग्ण आढळल्यानंतर, विमान प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आला आहे आणि ५.६ कोटी लोकांची चाचणी घेण्यात आली. ज्या भागात लॉकडाऊन आहे, तिथं पांढरे पीपीई किट घातलेले आरोग्य कर्मचारी रस्त्यावर फिरत आहेत. लोकांनी नाराजी व्यक्त करत त्यांना आता 'व्हाइट गार्ड्स' असं नाव दिलं आहे.

1000 लोकांना जबरदस्तीने क्वारंटाईनमध्ये पाठवलेलॉकडाऊन दरम्यान चीन सरकार लोकांवर पाळत ठेवण्यासाठी रोबोटिक श्वान आणि ड्रोनचा वापर करत आहे, त्याविरोधात लोकही संतापले आहेत. लोकांनी कुठेही जमू नये, अन्यथा कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा रोबोटिक डॉग आणि ड्रोनच्या माध्यमातून देण्यात येत आहे. एवढंच नाही तर चीन सरकार जबरदस्तीनं लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवत आहे. शांघायच्या बिकाई भागात सुमारे १ हाजर लोकांना जबरदस्तीने क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले असून त्यांची घरं सॅनिटाइज केली जात आहेत. आम्हाला व्हायरसपेक्षा लॉकडाऊनची जास्त भीती वाटू लागलीय, असं शांघायमधील एका व्यक्तीनं सांगितलं.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंचा धुमाकूळचीनमधील लोक लॉकडाऊनशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. यातील काही खरे आहेत तर काही व्हिडिओचं सत्य माहीत नाही, त्यामुळे अफवाही वेगाने पसरत आहेत. WeChat वर एका इमारतीला आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, तो खरा आहे. पण एका महिलेनं सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याचा व्हिडिओ चुकीचा आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या जेवणावरही लोक नाराजी व्यक्त करत आहेत. लोक सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आहेत, ज्यामध्ये दोन गाजर, एक भोपळा आणि बेदाणे आहेत. चीन आपल्या हुकूमशाही वृत्तीनं लोकांना नाराज करत आहे अशी प्रतिमा सोशल मीडियात तयार झाली आहे. साथीच्या रोगासोबतच झिरो कोविड धोरण, कुचकामी लस, खराब लस आणि मृत्यूंची चुकीची आकडेवारी हे सारं सरकारचं अपयश दाखवणारं आहे.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या