शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

CoronaVirus बापरे! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रोज तीस हजाराने होतेय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 5:11 AM

गेल्या ३६ दिवसांतील चित्र : जगभरातील बाधितांचा आकडा १३ लाखांच्या दिशेने

विशाल शिर्के ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडे २० जानेवारी रोजी वेगळा विषाणूचा आजार असल्याची नोंद चीनने केली. त्यानंतरच्या ७८ दिवसांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा १२ लाख ९७ हजार ४०४ वर गेला आहे. त्यातील १० लाख ८७ हजार ८५५ कोरोनाबाधितांची संख्या १ मार्चनंतर वाढली आहे. म्हणजेच गेल्या ३६ दिवसांमध्ये जगभरात दररोज ३० हजार २८८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, गेल्या सहा दिवसांत सव्वाचार लाख नवे रुग्ण समोर आले आहेत.

चीनच्या हुबेई प्रांतामधून कोरोना विषाणूचा (कोव्हिड-१९) प्रसार जगभर झाला. चीनने ३१ डिसेंबरला जागतिक आरोग्य संघटनेला कोणत्यातरी वेगळ्या विषाणूने न्यूमोनिया बाधितांची संख्या वाढत असल्याचे कळविले. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना त्यावर लक्ष ठेवून होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या २१ जानेवारी २०२० रोजीच्या अहवालात ‘२०१९-एनकोव्ह’ बाधित रुग्णांची संख्या अवघी २८२ होती. त्यातील २७८ चीनमधील होते. त्यातही हुबेई प्रांतामधे २५८, गुआंगडोंगमधे १४ रुग्णांचा समावेश होता. सुरुवातीला बाधितांची नोंद झालेल्या देशांमधे जपान, रिपब्लिक कोरिया प्रत्येकी १ आणि थायलंडमधे २ रुग्ण आढळल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेकडे झाली.यानंतर जगभरामधे कोरोनाचा वेगाने फैलाव होत असून, जगातील व्यवहार ठप्प पडले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळत असलेल्या देशांची संख्या चारवरून २०९ पर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत भारतासह २५ देशांमधे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्या वेळी असलेल्या ५० हजार ५८० पैकी ५० हजार ५४ रुग्ण एकट्या चीनमधील होते. अवघे ५२६ रुग्ण इतर देशांमधे आढळून आले. आत्ता सर्वाधिक पावणेतीन लाखांहून अधिक बाधित असलेल्या अमेरिकेमधे तर अवघे १५ रुग्ण होते.

त्यानंतर जगभरामधे प्रचंड वेगाने कोरोनाचा प्रसार झाला. जगभरात १ मार्चपर्यंत ८७ हजार रुग्ण होते. त्यातील ७९,९६८ चीनमधील होते. त्यानंतर मात्र, चीनने ८२ हजारांपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा मर्यादित ठेवल्याचा दावा केला आहे. यानंतर मात्र युरोपासह जगभरामधे वेगाने आकडा वाढला आहे. मार्चच्या १५ तारखेस दीड लाख बाधितांपैकी चीनमधे ८१ हजार आकडा होता. खालोखाल इटलीत २१ हजार बाधित होते. अमेरिकेत १ हजार ६७८ रुग्ण होते. त्यानंतरच्या १५ दिवसांत बाधितांच्या आकड्याचा विस्फोट झाला. मार्चअखेरीस बाधितांची संख्या साडेसात लाखांवर गेला. अमेरिका व इटलीच्या बाधितांची संख्या अनुक्रमे दीड आणि एक लाखावर गेली.मार्च नंतरच्या सहा दिवसांत सोमवारी (दि. ६) दुपार बाधितांची संख्या पावणेबारा लाखापर्यंत गेली. त्यात सातत्याने वाढ होत आहे. युरोपीय देश आणि अमेरिकेमधे त्यातील सुमारे सात लाख रुग्ण आहे. मार्च नंतरची स्थिती पाहिल्यास जगभरात ३० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या सहा दिवसांत दररोज ७० हजार ६६०च्या वेगाने बाधितांचा आकडा समोर आला आहे. या सहा दिवसांत ४ लाख २३ हजार ९६५ रुग्ण समोर आले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेला चीनने काय सांगितले?चीनने ३१ डिसेंबरला सांगितले वेगळ्या विषाणूमुळे न्यूमोनिया बाधितांची संख्या वाढत आहे.हुबेई प्रांतात ३ जानेवारीपर्यंत न्यूमोनिया बाधितांची संख्या ४४ वर.चीनने ७ जानेवारीला नवीन कोराना विषाणूची बाधा असल्याचे सांगितले.११ आणि १२ जानेवारी रोजी चीनने वुहानमधील मच्छी बाजारातून कोरोनाचा प्रसार झाल्याचा अहवाल दिला.१२ जानेवारी रोजी कोरोना विषाणूचा जनुकीय क्रम सांगितला; त्यामुळे चाचणी कीट बनविणे शक्य झाले .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या