कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये (Corona Pandemic) अवघ्या जगाच्या मदतीला धावून जाणाऱ्या भारताला कोरोनाने दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) घेरले आहे. अशावेळी अमेरिकेच्या दोन बड्या कंपन्या, ज्यांचे सीईओ भारतीय आहेत त्यांनी मोठी मदत देऊ केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने या मदतीची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला (Microsoft CEO Satya Nadella) यांनी अत्यंत दु:खी असल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनीची सारी ताकद भारतासाठी लावणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन Google ने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भारताच्या मदतनिधीमध्ये १३५ कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. (Satya Nadella, Sundar Pichai said that his company will continue to use its resources and technology for relief efforts and support buying oxygen devices, 135 crore fund respectively.)
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी, भारतातील कोरोना परिस्थिती पाहून आपले हृदय दुखावले असल्याचे म्हटले आहे. भारतात दिवसाला लाखो रुग्ण सापडू लागले आहेत. आपली कंपनी भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपले तंत्रज्ञान आणि ऑक्सिजन यंत्रणा खरेदीसाठी मदत करणार असल्याचे सांगितले.
तर अमेरिकेचीच आणखी एक कंपनी गुगल आणि अल्फाबेटचे भारतीय वंशाचे सीईओ सुदर पिचाई (Google and Alphabet CEO Sundar Pichai) यांनी देखील युनिसेफच्या भारतासाठीच्या मदतीच्या फंडामध्ये आपली कंपनी १३५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली. तसेच भारताला फायदा न घेता वैद्यकीय मदत, कोरोनाच्या प्रसाराची आणि रोखण्याची सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.