जगभरात कोरोनाने थैमान घातलं असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 197,400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 28 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. तसेच अनेक जण आपल्याला जमेल तशी इतरांना मदत करताना दिसत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. या कोरोनाच्या संकटात अमेरिकेत एक भारतीय मुलगी अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत आहे. लोकांच्या चेहऱ्यावर हासू फुलवण्याचं काम करत आहे. हीता गुप्ता असं 15 वर्षीय मुलीचं नाव असून ती अमेरिकेतील पेन्सिलवेनियातील कोनेस्टोगा हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकते. लॉकडाऊनमुळे ती सध्या घरातच आहे. मात्र याही काळात लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम करत आहे.
15 वर्षांची हीता एक ब्राइटनिंग अ डे नावाची एनजीओ चालवते. ती अमेरिकेतील नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या वृद्धांच्या आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर हासू आणत आहे. त्यांना गिफ्ट देऊन आणि खास प्रेरणादायी पत्रं लिहून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गोष्टींची पुस्तके, विविध रंगांच्या पेन्सिल्स असे गिफ्ट देऊन ती स्वत:च्या हाताने लिहिलेली पत्र पाठवत आहे. हीताच्या या कामाचं जगभरातून कौतुक होत आहे. 'कोरोनाच्या संकटात एकट्या पडलेल्या जेष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की ते एकटे नाहीत हे सांगण्याची. मी यासाठी स्वत:च्या पैशातून गिफ्ट पाठवायला सुरुवात केली. आतापर्यंत 16 स्थानिक नर्सिंग होममध्ये राहणाऱ्यांसाठी गिफ्ट पाठवले' असल्याची माहिती हीताने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. उमा मधूसूदन असं या भारतीय वंशाच्या डॉक्टरचं नाव असून त्या सध्या साऊथ विंडसरमध्ये राहतात. उमा मधूसूदन यांनी अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले असून त्यातील अनेक जण बरे झाले आहेत. उमा यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा अमेरिकेतील लोकांनी अनोख्यारितीने सन्मान केला आहे. तब्बल 100 गाड्यांच्या ताफ्यासह त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेतील लोकांनी गाड्यांचे हॉर्न वाजवत त्यांचा सन्मान केला. या कौतुकास्पद घटनेचा एक व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा सुरू करता येतील; बिल गेट्स यांनी दिले 'हे' मोलाचे सल्ले
Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल
Coronavirus : लग्नाचा वाढदिवस पण ड्युटी फर्स्ट, 'या' डॉक्टर दाम्पत्याचं तुम्हीही कराल भरभरून कौतुक
Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! वर्दीसह आईचीही जबाबदारी चोख पार पाडतेय 'ही' कोरोना योद्धा
Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा