वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये एच-१ बी या कामासाठीच्या व्हिसा किंवा ग्रीन कार्ड असलेले भारतीय दुहेरी संकटात सापडले आहेत. अमेरिकेमध्ये कोरोनाने कहर केला आहे. यामुळे लॉकडाऊन झाल्याने हजारो भारतीयांच्या नोकऱ्या गेल्यात किंवा संकटात आहेत. अशातच एअर इंडियानेही या भारतीयांना मायदेशात आणण्यास नकार दिला आहे.
जे भारतीय अमेरिकेत स्थायीक झाले आहेत किंवा एच-१ बी व्हिसावर गेले आहेत व ज्यांची मुले अमेरिकेत जन्मल्याने मुलांना अमेरिकी नागरिकत्व मिळालेले आहे असे भारतीय मोठ्या संकटात सापडले आहेत. जगभरात विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे भारताने परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी एअर इंडिया आणि नेव्हीकडून वंदे भारत मोहिम सुरु केली आहे. यानुसार एअर इंडियाची विमाने अमेरिकेत गेली आहेत. या विमानांचे तिकिट या नागरिकांना नाकारले जात आहे.
भारत सरकारने गेल्या महिन्यात जारी केलेल्या नियमांमध्ये नुकताच मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार परदेशी नागरिकांचे व्हिसा आणि ओसीआय कार्ड ( जे भारतीय नागरिकांना बिना व्हिसा प्रवास करण्याची परवानगी देते) ला नवीन आंतरराष्ट्रीय प्रवास बंदीमुळे रद्द करण्यात आले आहे. यामुळे न्यू जर्सीच्या एका कुटुंबाला फटका बसला आहे.
या कुटुंबाची नोकरी गेली आहे. कायद्यानुसार त्यांना ६० दिवसांत भारतात परतावे लागणार आहे. मात्र, त्यांची दोन्ही मुले अमेरिकी नागरिक आहेत. सोमवारी ते भारतात परतण्यासाठी नेवार्क विमानतळावर आले होते. मात्र, एअर इंडियाने त्यांच्या मुलांन तिकिट देण्यास नकार दिला. दांपत्य भारतीय नागरिक आहेत. यामुळे या कुटुंबाला विमानतळावरून माघारी जावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या...
गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका