वॉशिंग्टन : कोविड-१९ या विषाणूवर वर्षाअखेरपर्यंत लस येऊ शकेल, असा अंदाज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला होता; मात्र त्याबाबत लस कधी निघेल त्याची निश्चित वेळ सांगता येणार नाही, अशी माहिती अमेरिकेचे अन्न व औषध विभागाचे आयुक्त स्टीफन हॅन यांनी दिली.हॅन म्हणाले, कोविड -१९ वर लस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. सध्या आम्ही वैज्ञानिक माहिती गोळा करीत आहोत, त्या आधारे लवकरच परिणामकारक आणि सुरक्षित लस विकसित केली जाईल.जुलैमध्ये देशाला संबोधन करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प म्हणाले होते की, वर्षाअखेरपर्यंत देशात कोरोनावर उपचार किंवा लस विकसित होईल. त्यावर भाष्य करताना हॅन म्हणाले, आम्ही लस विकसित होण्याबाबत आशावादी आहोत. मात्र, त्याची नक्की वेळ सांगता येणार नाही. वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या आरंभास लस विकसित होऊ शकेल.
coronavirus: लस कधी निघेल सांगणे कठीण! - स्टीफन हॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 4:15 AM