कोरोनानंतर अर्थव्यवस्थांचे काय असा प्रश्न आहेच. जागतिक अर्थव्यवस्था आणि व्यापार यांचं काय होईल, ते काय दिशेनं जाईल याचे आता केवळ अंदाज बांधले जात आहेत.मात्र भविष्यात काय होईल याची झलक आता दिसू लागली आहे.जपानने आपल्या मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांना सांगितलं आहे की, चिनमधे असलेलं तुमचं काम थांबवा. युनिट बंद करा. ते जपानमध्ये आणा नाहीतर जगातल्या दुस:या कुठल्या देशात हलवा.पण चीनमध्ये मात्र आता मॅन्यूफॅक्चरिंग करायचं नाही.त्यापायी या कंपन्यांचं जे नुकसान होऊ शकेल त्याची घसघशीत रक्कम मोजायची तयारीही जपान सरकारने दाखवली आहे.त्यासाठी जपानने वेगळी आर्थिक तरतूद केली असून सुमारे 2क्क् कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम कंपन्यांना शिफ्टिंगसाठी देता यावी म्हणून देण्यात येतील असे जाहीर करण्यात आले आहे. अन्य देशात आपली कंपनी हलवणा:यांनाही घसघशीत आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे जपान सरकारने जाहीर केले असून त्यासंदर्भातला आराखडा ऑनलाइन टाकण्यात आल्याचे वृत्त ब्लूमबर्ग न्यूजने दिले आहे.हे मॅन्यूफॅक्चरिंग युनिट चिनमधून हलवण्याचे कारण म्हणजे जपान सरकारला आता असं वाटतं आहे की, आपल्या कंपन्या मॅन्यूफॅक्चरिंग बेस म्हणून चीनवर अवलंबून आहेत, ते अवलंबित्व कमी करायला हवे.एक सरकारी समिती गठित करण्यात आली असून ती समिती भविष्यात कुठे आणि कशी गुंतवणूक करावी यासंदर्भात अभ्यास करुन अहवाल देणार आहेत. त्या समितीनेच हे सुचवलं की, अतिशय महत्वाच्या वस्तू ( हाय एडेड व्हॅल्यू प्रॉडक्ट्स) चे उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग जपानमध्येच करणं योग्य ठरणार आहे. तसं करावं. आणि बाकी वस्तूंचं उत्पादनही चिनऐवजी अन्य दक्षिण-पूर्व आशियाई देशांत विखरुन करण्यात यावं.जपान सरकारच्या या निर्णयावर चीन आणि बाकी देश काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं गरजेचं आहे. मात्र चिनने कोरोनाचा उद्रेक लपवला आणि झाकपाक केली, त्याची किंमत सा:या जगाला मोजावी लागत आहे असं जगभर बोललं जातं, तेच या निर्णयाचा पाया ठरलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच जपाने ही पाऊलं उचलली असावीत असा अंदाज आहे.ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, आपली मॅन्युफॅक्चरिंग युनिट चिनमध्ये असल्याने अनेक जपानी व्यावसायिक, कंपन्या यांना गेल्या महिन्यात मोठा अर्थिक फटका बसला. चीन हा जपानचा मोठा व्यावसायिक भागिदार आहे. मात्र चिनमध्ये लॉकडाऊन झालं, फॅक्ट:या बंद झाल्या, काम थांबलं त्यामुळे आयात कमी झाली. जपानी उद्योजकांना कामासाठी आवश्यक वस्तू, अवजारं, घटक मिळेनात आणि त्याचा फटका जपानी अर्थव्यवस्थेलाही बसला.टोक्यो शोको रिसर्च या संस्थेनं फेब्रुवारीत एक सव्र्हेक्षण केलं होतं. 26क्क् कंपन्या त्यात त्यांनी नोंदवल्या. त्यात 37 टक्के कंपन्यांनी असं सांगितलं होतं की, चीनमध्ये सुरु असलेलं आपलं काम आता अन्य देशात नेण्याची गरज आहे. तसं विकेंद्रीकरण त्यांनी सुरु केलं आहे.कोरोना नंतर जग आधीसारखं राहणार नाही. जगात एक पुरवठा साखळी तयार झाली होती ती कोरोनाने आताच तोडली आहे. आणि आता अनेक देश आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि भविष्याचा विचार करुन जपानसारखाच वेगळा विचार करण्याचीही शक्यता आहे.
coronavirus : जपान सरकारचा कंपन्यांना आदेश चिनमधून बाहेर पडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 6:17 PM
आता अनेक देश आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि भविष्याचा विचार करुन जपानसारखाच वेगळा विचार करण्याचीही शक्यता आहे.
ठळक मुद्देजगात एक पुरवठा साखळी तयार झाली होती ती कोरोनाने आताच तोडली आहे.