अमेरिका - कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे बर्याच क्षेत्रांतील कामावर परिणाम होत आहे. पोलिसांपासून डॉक्टरांपर्यंत प्रत्येकजण यावेळी लोकांना वाचविण्याचा आणि त्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे लक्षात घेता अमेरिकेतील बर्याच राज्यांच्या पोलिसांनी ज्यांची चर्चा जगभरात आहे अशा कोरोनाबाबत गुन्हेगारांना आवाहन केले आहे. पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारांना आवाहन करीत आहेत की, जोपर्यंत कोरोनाचा कहर आहे, तोपर्यंत कोणताही गुन्हा करु नका.फ्यूलिप पोलीस विभागाकडून ट्वीटद्वारे असे आवाहन करण्यात आले आहे की, सध्या कोरोना विषाणूमुळे परिस्थिती गंभीर बनत आहे, अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया थांबवाव्यात असे आम्ही आवाहन करतो. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही आपल्या सहकार्याचे आभार मानतो. जेव्हा परिस्थिती सामान्य असेल, तेव्हा आम्ही आपल्याला सांगू आणि मग आपण आपले काम सुरू करा.
फ्यूलिप पोलिसांप्रमाणेच ओहिया, उटाह, वॉशिंग्टनसह १२ शहरांमध्ये किंवा राज्य पोलीस प्रशासनाच्यावतीने सोशल मीडियावरही अशा प्रकारे आवाहन करणारे पोस्ट करण्यात आले आहे.अमेरिकेत सतत वाढत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत येथे 6500 हून अधिक पॉझिटिव्ह कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे, तर मृतांचा आकडा 100 च्या वर गेला आहे. कोरोना प्रभाव कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युरोपियन देशांतील विमान कंपन्यांवर बंदी घातली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कोरोनामुळे देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी शक्यतो घरीच राहावे आणि आवश्यकतेनुसारच घरातून बाहेर पडावे. अमेरिकेतील सुमारे 40 राज्यांमध्ये सार्वजनिक शाळा, बार, रेस्टॉरंट्स बंद करण्यात आले आहेत.