दक्षिण अमेरिकेतले देश. बोलाविया, अर्जेण्टिना आधीच गरीबी आणि अस्मानी सुलतानी संकटांनी होरपळलेले आहेत.त्यात तिथं कोरोना पोहोचला. बोलावियात सध्या 672 पॉङिाटिव्ह आणि 40 मृत्यू अशी आकडेवारी आहे. मात्र या कोरडय़ा आकडेवारीपलिकडे आहे या देशातल्या भिषण लॉकडाउनची गोष्ट.बोलावियात मोठे उद्योग नाहीत. सगळा व्यवसाय-व्यापार रस्त्यावर. साधारण 15 लाख लोक या देशात फिरते विक्रेते, स्ट्रिट वेंडर्स आहेत. त्यांचं पोट त्याच्यावरच चालतं. सरकारने लॉकडाउन केलं आणि त्यांचं काम ठप्प झालं. सरकारने वायदाही केला की, आम्ही सगळ्यांना अन्नधान्य देऊ. मात्र सरकार सर्वदूर पोहचू शकत नाही, यंत्रणोच्या मर्यादा उघडडय़ा पडल्या आहेत.एकीकडे बोलावियातलं स्ट्रिट फूड अत्यंत नावाजलं जातं. ते खायला लोक विदेशातून येतात. ते खाणं हा काहींना साहसी खेळही वाटतं आणि मग बोलावियात स्ट्रिटू फूड खाताना अमूक काळजी घ्या, तमूक करा असे लेखही व्हायरल केले जातात.आता ते सारंच ठप्प झालं आणि माणसांचे हातच नाही तर पोटंही रिकामं राहू लागलं.आता तिथंही तोच प्रश्न आहे की,कोरोना संसर्गानं मरायचं की भूकबळीनं.आता लोक बोलू लागलेत की, आमचा बहुतेक भूकबळी जाणार.न्याताहा, नावाची महिला एक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगते, मला सहा मुलं आहेत. मी एकल माता आहे. माङया हाताला काम नाही तर या मुलांचं पोट कसं भरु? सरकार म्हणतं अन्न देऊ, पण कधी देणार ? आम्ही मेल्यावर?’सरकारही दुस:या बाजूला हतबल आहे.एक सैन्य सोडलं तर दुसरी काही व्यवस्थाच त्यांच्याकडे नाही जी या संकटाचा सामना करु शकेल.सैन्याच्या धाकाने आधी लोक घरात बसवले, आता तेच सैन्य अन्नधान्य पोहचवणं, औषधं, पेट्रोल ते जीवनावश्यक गरजा पोहचवत आहे.आरोग्य यंत्रणा उभी राहते आहे, ती सज्ज होते आहे तोवर सैनिकी दवाखाने वापरण्यात आले.सैन्याच्या मदतीनं सरकार संकटाशी दोन हात करतं आहे, मात्र यासा:याला मानवी चेहरा नाही.भूकेल्या माणसांचं काय होईल? याचं उत्तर आजच्या घडीला नाही.कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकार राबतं आहे हे ही खरं आहे आणि माणसं उपाशी आहेत हे ही.
कोरोनाने मरायचं की भूकबळीनं? बोलावियातल्या जनतेचा जगण्याचा संघर्ष.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:28 IST
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकार राबतं आहे हे ही खरं आहे आणि माणसं उपाशी आहेत हे ही.
कोरोनाने मरायचं की भूकबळीनं? बोलावियातल्या जनतेचा जगण्याचा संघर्ष.
ठळक मुद्देभूकेल्या माणसांचं काय होईल? याचं उत्तर आजच्या घडीला नाही.