जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत 3100 लोकांचा मृत्यू झाला असून 90 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या 21 पैकी 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लिथुआनियाच्या एका व्यक्तीने कोरोना व्हायरसच्या संशयावरून आपल्या पत्नीला बाथरुममध्ये कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लिथुआनियाच्या एका व्यक्तीने कोरोना व्हायरसच्या भीतीने आपल्या पत्नीला बाथरुममध्ये कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीची पत्नी इटलीवरून आलेल्या एका चिनी महिलेला भेटली होती. त्यामुळे कोरोना होईल या भीतीने त्याने पत्नीला बाथरुममध्ये बंद केलं. महिलेने पोलिसांना फोन करून हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी तिची सुटका केली. डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीला कोंडून ठेवणाऱ्या व्यक्तीने फोनवर डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यानंतर त्याने कोरोनाच्या भीतीने तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवले.
महिलेला कोरोनाचा संसर्ग खरंच झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तिची चाचणी करण्यात आली. मात्र तिला कोरोनाची लागण झालेली नाही. चीनमधील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे सांगितले जात असले तरी जगात मात्र या घातक आजाराने पाय पसरले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगात 70 देशांत कोरोना (कोविड-19) पसरला. अमेरिकेत कोरोना विषाणूंमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 91 जणांना संसर्ग झाला आहे. तर इराणमध्ये आणखी 11 लोकांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या आता 77 वर पोहोचली आहे.
भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 6 होती. त्यात आता इटलीहून आलेल्या 15 पर्यटकांची भर पडल्यानं हा आकडा 21 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 6 भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला. यातले तीन जण केरळचे होते. या सर्व रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाची पावलं उचलली आहेत. तीन मार्च किंवा त्याआधी व्हिसा जारी करण्यात आलेल्या इटली, इरान, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना भारतात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजदूत, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, ओसीआय कार्डधारक यांना मात्र यामधून वगळण्यात आलं आहे. मात्र त्यांना वैद्यकीय चाचण्यांनंतर देशात प्रवेश दिला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची बाधा; एम्सकडून दुजोरा
विद्या चव्हाण यांच्या सुनेचा खळबळजनक दावा, 'ब्लॅकमेल' करत असल्याचाही आरोप
Narendra Modi : 'मोदींची नाट्यछटा, अफवांनी प्राण तळमळला!'; शिवसेनेचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप
कोरोनामुळे देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क