जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोननामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 22 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या आता 221,110,991 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 4,575,333 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनाची लढाई जिंकली आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.
116 वर्षांच्या आजींनी 'कोरोना युद्ध' जिंकलं आहे. उपचारानंतर कोरोना व्हायरसवर मात केली आहे. तुर्कीमध्ये ही सकारात्मक घटना घडली आहे. कोरोना विरोधातील लढाई जिंकणाऱ्या सर्वाधिक वयोगटातील लोकांमध्ये आता या आजींचा देखील समावेश झाला आहे. आयसे कराते असं या तुर्कीतील आजीबाईंचं नाव आहे. त्यांच्यावर तीन आठवडे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आता त्याची प्रकृती ठीक आहे. त्यांचा मुलगा इब्राहिमने शनिवारी डेमिरोरेन या न्यूज एजन्सीला याबाबत माहिती दिली. तसेच आजींना आता जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याचं देखील सांगितलं आहे.
21 दिवसांचा लढा, ICU मध्ये सुरू होते उपचार अन् झाला चमत्कार
इब्राहिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझी आई 116 व्या वर्षी आजारी पडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर तीन आठवडे आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आता तिची प्रकृती ठीक आहे." याआधी देखील अनेक वयस्कर मंडळींनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत असून अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंतची सर्वात भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.
भीषण, भयंकर, भयावह! अमेरिकेत 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण
महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. अमेरिकेत दर सेकंदाला कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर रुग्णांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 6.62 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात देखील जागा शिल्लक नसल्याचं चित्र आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत असून अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंतची सर्वात भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.