चीनमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा कहर केला आहे. गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर चीनमधील जिलीन शहरात तात्पुरते रुग्णालय बांधले जात आहे. हे रुग्णालय सहा दिवसांत तयार करण्यात येत असून सहा हजार बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने शेअर केलेला व्हिडिओमध्ये ईशान्य चीनच्या जिलीन प्रांतांतर्गत येणाऱ्या शहरातील रुग्णालयाचे बांधकाम पाहायला मिळत आहे. 12 मार्चपर्यंत या भागात तीन तात्पुरती रुग्णालये आधीच बांधली गेली आहेत.
रविवारी कोरोना व्हायरसच्या एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या आहेत. जिलीनच्या लोकांनी आतापर्यंत चाचणीच्या सहा फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. जिलीन प्रांतातील सिपिंग आणि दुनहुआ या छोट्या शहरांमध्येही अधिकाऱ्यांनी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. दरम्यान, सोमवारी चीनमध्ये कोरोना विषाणूचे 2,300 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, रविवारी सर्वाधिक 3,400 रुग्णांची नोंद झाली. अधिकाऱ्यांनी कोविड-19 हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. शांघायमध्ये शाळा, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स आणि व्यवसाय तात्पुरते बंद आहेत.
बीजिंगमध्ये निवासी भागात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर, बीजिंगमधील प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे. लोकांना अत्यावश्यकतेशिवाय शहराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. चीनमध्ये प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. शेनझेन शहरात कोरोना लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर शहरात राहणारे 1.7 कोटी लोक त्यांच्या घरात बंद झाले आहेत.
परिस्थिती गंभीर! चीनच्या 'या' शहरात कोरोनाचा हाहाकार; लॉकडाऊनमुळे 1.7 कोटी लोक घरातच बंद
चीनच्या स्थानिक प्रशासनाने प्रथमच कोरोना रॅपिड टेस्ट सुरू केल्या आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा कहर केला आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जिलिनच्या ईशान्य प्रांतात 2,100 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. या दरम्यान बाहेरून आलेल्या 200 कोविड रुग्णांची पुष्टी झाली. याच क्रमाने आता चीनच्या शेनझेन शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर 1.7 कोटी लोक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. चीनने म्हटलं आहे की इतकी प्रकरणे म्हणजे कोविड शून्य धोरणाला मोठा धक्का आहे. त्याचबरोबर चीनमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले असून त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.