कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा आता हाहाकार पाहायला मिळत आहे. डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका हा तरुणांना असल्याची माहिती आता समोर आली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्येही हीच स्थिती असल्याचं म्हटलं जात आहे.
न्यू साऊथ वेल्समध्ये 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बाधितांमध्ये 30 ते 49 या वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक होती. यातील 45 रुग्ण हे 30 ते 40 या वयोगटातील होते. तसेच या वयोगटापेक्षाही कमी वयातील 13 जणांना आयसीयूत दाखल करण्यात आले. आयसीयूतील रुग्णांपैकी 36 टक्के प्रमाण तरुणांचे आहे. बाधितांमध्ये तरुणांची वाढलेली संख्या लक्षात घेता चिंतेत भर पडली आहे. तरुणांमध्ये डेल्टाची लागण अधिक होत असल्याने तज्ज्ञ देखील हैराण झाले आहेत. रिसर्चमधून याबाबत दावा करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियात कोरोनाची सुरू झाल्यानंतर नोंदवण्यात आलेल्या कोरोनाबाधितांच्या प्रकरणात वय 20 ते 29 या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण 22 टक्के आहे. तर रिपोर्टनुसार, न्यू साऊथ वेल्समध्ये गुरुवारी नोंदवण्यात आलेल्या नवीन प्रकरणांपैकी 67 टक्के प्रकरणे 40 पेक्षा कमी वयोगटातील आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. पुन्हा एकदा अमेरिकेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज कोरोनाचे एक लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ झाली असून हॉस्पिटलमध्ये आता जागाच शिल्लक नसल्याचं चित्र आहे.
चिंता वाढली! Delta नंतर आता कोरोनाचा Eta Variant; 'या' राज्यात सापडला पहिला रुग्ण, तज्ज्ञही हैराण
डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटनंतर आता आणखी एक व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. कोरोनाचा एटा व्हेरिएंट (Eta variant) आढळला आहे. कर्नाटकच्या (Karnataka) मंगळुरूमध्ये कोरोनाच्या एटा व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी मंगळुरूतील एका व्यक्तीला एटा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. चार महिन्यांपूर्वी ही व्यक्ती कतारला गेली होती. मात्र एटा संसर्गाचं हे पहिलं प्रकरण नाही आहे. याआधी एप्रिल 2020 मध्ये राज्यात एटा व्हेरिएंटचा रुग्ण सापडला होता, असं राज्याचे नोड अधिकारी आणि कोरोना होल जीनोम सीक्वेंसिंग समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. रवी यांनी सांगितलं.