जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला असून 44 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून डेल्टा व्हेरिएंटचा कहर दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान स्वीडनमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. आठवडाभर सुरू असलेल्या 'सेक्स फेस्टिवल'ने कोरोनाचा अत्यंत वेगाने प्रसार झाल्याची घटना घडली आहे. तब्बल 100 हून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
सेक्स फेस्टिवलमध्ये सिंगल लोकांना सहभागी होण्याची परवानगी नसते. फक्त कपल्सनाच एंट्री दिली जाते. आफ्टनब्लॅडेटच्य़ा एका रिपोर्टनुसार, वर्मलँड काऊंटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्यानंतर 100 हून अधिक लोक कोरोना संक्रमित म्हणून आढळून आले आहेत. तसेच रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना तातडीने माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजक यामध्ये दोषी आढळले तर त्यांना दंड आणि जेलची शिक्षा भोगावी लागू शकते.
स्वीडनच्या अनेक मुख्य शहरांमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. जुलैमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती, मात्र सरकारने लोकांना सोशल डिस्टंसिंगचं पालन करा असं आवाहन केलं होतं. सेक्स फेस्टिवलनंतर 100 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्यावर आयोजकांनी स्थानिक लोकांची माफी मागितली आहे. रिपोर्टनुसार, जवळपास 40 लोकांना आयसोलेट करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून प्रगत देशही हतबल झाले आहेत.
देशात डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार! लसीकरणानंतरही होतेय कोरोनाची लागण; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून लसीकरणानंतरही कोरोनाची लागण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इन्साकॉगने बुलेटिन जारी करून डेल्टा व्हेरिएंटवर चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत 72 हजारांहून अधिक सँपल्सचं जीनोम सीक्वेंसिंग करण्यात आलं आहे. 20 हजारांहून अधिक सँपल्समध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. रिपोर्टनुसार, देशात 72931 सँपलचं जीनोम सीक्वेंसिंग करण्यात आलं. त्यातील 30230 जणांमध्ये कोरोनाचे गंभीर व्हेरिएंट आढळून आले आहेत. इन्साकॉगनुसार, आतापर्यंत डेल्टा व्हेरिएंटमध्ये 13 म्यूटेशन झाले आहेत. ज्यातील पाच भारतातही आहेत. अमेरिका, ब्रिटन, चीनसह 100 हून अधिक देशांमध्ये डेल्टाचे रुग्ण आढळून आले आहेत. रिपोर्टनुसार, 6.7 कोटी लोकसंख्या असलेल्या ब्रिटनमध्ये आतापर्यंत 18 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1.20 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली असून देखील ते संक्रमित झाले आहेत.