वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिकेसह अनेक देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ही सहा कोटींच्या वर गेली आहे.
कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 2296 लोकांचा मृत्यू झाला. तर तब्बल 1.80 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी 20 नोव्हेंबर रोजी 2.04 प्रकरणं समोर आली होती. तर भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने देखील 92 लाखांचा टप्पा पार केला आहे.
जगभरात कोरोनाचे तब्बल 60,719,949 रुग्ण
कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारतानंतरब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये कोरोनाचे 45 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. तर 620 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 47 टक्के कोरोनाचे रुग्ण हे अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशातील आहेत. अमेरिकेतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही एक कोटी 31 लाखांच्या वर पोहोचली आहे. जगभरात कोरोनाचे तब्बल 60,719,949 रुग्ण आहेत तर आतापर्यंत 1,426,823 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
चीनने तयार केली कोरोनावर 'सुपर वॅक्सीन'?; 10 लाख लोकांवर केली चाचणी पण 'नो साइड इफेक्ट'
चीनने कोरोनावर 'सुपर वॅक्सीन' तयार केल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत ही कोरोना लस तब्बल 10 लाख लोकांना दिली आहे. मात्र यापैकी कोणावरही कोणताही साइड इफेक्ट दिसला नाही. त्यामुळेच 'सुपर वॅक्सीन' असल्याचं म्हटलं जात आहे. चीनी कंपनी सिनोफार्मने विकसित केलेल्या या लसीची सध्या अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. मात्र, चीन सरकारने आपत्कालीन परिस्थितीत ही लस वापरण्यास मंजुरी दिली आहे. आतापर्यंत ही लस दहा लाख जणांना देण्यात आली आहे. सिनोफार्मचे चेअरमन लियू जिंगजेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना लस देण्यात आली. मात्र, त्यांच्यात कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. काही लोकांनी एकदम छोट्या स्वरुपाच्या तक्रारी केल्या आहेत. परदेशातील आमच्या एका कार्यालयातील 99 पैकी 81 जणांना ही लस देण्यात आली.