जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 346,719 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 55 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 5,500,577 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 2,302,057 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
केस कापायला जाणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे तब्बल 91 कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका न्हाव्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळं त्याच्या संपर्कात आलेले तब्बल 91जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. द गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या आठवड्यात काही व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सलूनमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यामध्ये साधारण 8 दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. सेल्फ आयसोलेशन करण्याऐवजी त्याने काम सुरू ठेवले. ज्यामुळे सलूनच्या 84 ग्राहक आणि 7 कर्मचाऱ्यांना म्हणजेच एकूण 91 जणांना कोरोनाची लागण झाली. वैद्यकीय विभाग सर्व कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती
सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड
CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्...
CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये मैत्रिणीला लपून-छपून भेटणं भाजपा नेत्याला चांगलंच पडलं महागात
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरण