शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

CoronaVirus कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 13:24 IST

आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या पाकिस्तानसला मदत करण्य़ासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी जगभरातील जळपास सर्वच देशांसमोर हात पसरले होते. जागतिक बँकेसह अनेकांनी पाकिस्तानला पैसे देण्यास चालढकल केली होती.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोनाने कहर सुरु केला आहे. त्यातच दहशतवाद्यांना पोसणाऱ्या या देशाकडे दमडीही नसल्याने आधीच दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्तानकडून जगभरात मदतीची याचना केली जात होती. हालत एवढी खराब की भारताचा बळकावलेला भाग चीनला धरण बांधण्यासाठी देण्यापर्यंत या देशाची मजल गेली होती. अखेर अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला धावून आली आहे. 

आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या पाकिस्तानसला मदत करण्य़ासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी जगभरातील जळपास सर्वच देशांसमोर हात पसरले होते. जागतिक बँकेसह अनेकांनी पाकिस्तानला पैसे देण्यास चालढकल केली होती. तर चीनचे अब्जावधी डॉलरचे कर्ज पाकिस्तान आधीच दहशतवादावर उधळून बसला होता. अमेरिकेनेही मदत गेल्या वर्षीपासून थांबविली होती. मात्र, कोरोनामुळे अमेरिकेने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानमधील अमेरिकी राजदूत पॉल जोन्स यांनी शनिवारी एका व्हिडीओ संदेशामध्ये सांगितले की, अमेरिका पाकिस्तानला ६० लाख डॉलरची मदत देऊ करत आहे. ही रक्कम कोरोनाशी कोणतेही संरक्षण नसताना लढणाऱ्या आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येऊ शकते. यामुळे हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरस पसरण्यापासून रोखता येऊ शकते. 

पॉल जोन्स यांनी सांगितले की, संक्रमित भागांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांसाठी मोबाईल प्रयोगशाळा बनविण्य़ात येणार आहेत. ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा देत रमजानचा महिना पूर्ण झाल्याच्या पाकिस्तानला शुभेच्छा देत आहे. 

महत्वाचे म्हणजे अमेरिकेला पाकिस्तानने काही आरोग्यविषयक साहित्य पाठविले होते. यामुळे अमेरिकेने त्यांचे आभार व्य़क्त केले होते. पाकिस्तानी आरोग्य मंत्रालयानुसार सिंधमध्ये 21,645, पंजाबमध्ये 19,557, खैबर-पख्तूनख्वामध्ये 7,685, बलुचिस्तानमध्ये 3,306 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर एकूण १७१९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले पण फेसबुकद्वारे जोडणारा झकरबर्ग मालामाल झाला

CoronaVirus अडेलतट्टू चीन नरमला; तातडीने कोरोना जन्माच्या तपासाला तयार झाला

चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याTerrorismदहशतवाद