कोरोनाने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनामुळे काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच रुग्णसंख्या वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे रुग्णांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना सुरू असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन बहुतेक देशांमध्ये पोहोचला आहे आणि तो अभूतपूर्व वेगाने पसरत आहे असं म्हटलं आहे. तर काही देशांमध्ये यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता इस्रायलमध्येओमायक्रॉनने पहिला बळी घेतला आहे. पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.
इस्रायल सरकारने तातडीने देशातील हवाई वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. तसेच याशिवाय अनेक गोष्टींवरील निर्बंधांचा सध्या विचार सुरू आहे. इस्रायलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी देशामध्ये पहिल्या ओमायक्रॉन मृत्यूची नोंद झाल्याची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, बेर्शेबा येथील सोरोका रुग्णालयात एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात दोन आठवडे उपचार सुरू होते. इस्रायलने देशातील हवाई वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी अनेक कठोर उपाययोजनांवर सध्या काम सुरू आहे.
कोरोनामुळे 8200 लोकांनी गमावला जीव
पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध नागरिक आणि गंभीर आजारांशी सामना करणाऱ्या लोकांसाठी चौथ्या बूस्टर डोसला मंजूरी देण्याबाबत विचार सुरू आहे. यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला जात आहे. इस्रायलमध्ये लसीकरण वेगाने सुरू असून बूस्टर डोसचा देखील विचार होत आहे. 9.3 मिलियन लोकसंख्या असलेल्या इस्रायलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 8200 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले जात आहे.
टेन्शन वाढलं! 'वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; कोरोनामुक्त झालेल्यांना, लस घेतलेल्यांना होतोय संसर्ग'
कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना किंवा यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आता समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ट्रेडोस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेतलेल्यांना किंवा यापूर्वी कोरोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार जगामधील 89 देशांमध्ये कोरोनाच्या या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका असणाऱ्या भागांमध्ये रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांमध्ये दुप्पटीने वाढत आहे. अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.