जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 357,467 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 5,792,253 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दीड लाखांहून अधिक झाली असून आतापर्यंत 4000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भारताच्या शेजारच्या एका देशात कोरोनाच्या संसर्गाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनावर मात करण्यात भूतान हा देश यशस्वी झाला असून कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. भूतानमध्ये सध्या 27 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यातील सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. भूतानमध्ये परदेशातून परतलेल्या नागरिकांमुळे कोरोनाची बाधा असल्याचे समोर आलं आहे. मात्र आतापर्यंत एकाही व्यक्तीचा या देशात कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.
पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये कोरोनाचे 58 हजार रुग्ण आहेत. तर 1197 जणांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशमध्ये करोनाबाधितांची संख्या 36 हजारांवर पोहचली आहे. तर 522 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे सात हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये 11 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे 220 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत अफगाणिस्तान 45 क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेत 1319 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत श्रीलंका 100 व्या स्थानी आहे. नेपाळमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. नेपाळमध्ये रुग्णांची संख्या 772 वर पोहचली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
संतापजनक! हा कसला बाप?... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का
CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला
CoronaVirus News : भयंकर! 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...
CoronaVirus News : बापरे! 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर
CoronaVirus News : भयंकर! आधी जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, कुटुंबाला सोपवला भलताच मृतदेह पण...