नवी दिल्ली : चीनच्या कोरोनाने जगाचे कंबरडे मोडून ठेवले आहे. अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला ५० नॅनोमीटरच्या व्हायरसने सुरुंग लावला असून यामुळे जगातील बहुतांश कंपन्या चीनवर नाराज आहेत. यामुळे या कंपन्या चीन सोडण्याच्या विचारात असून लवकरच मोबाईल निर्मिती क्षेत्रातली एका मोठी कंपनी भारतात येणार आहे.
मोबाईल साहित्य बनविणारी कंपनी लावा इंटरनॅशनल ने चीनला मोठा झटका दिला आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, चीनमधील प्रकल्प कायमचा बंद करून भारतात येत आहोत. कंपनीच्या संचालकांचे म्हणणे आहे की, आम्ही आता भारतातून चीनला मोबाईल निर्यात करणार आहोत. यासाठी पुढील पाच वर्षांत भारतात ८०० कोटी रुपये गुंतविण्यात येणार आहेत.
लावा मोबाईल कंपनीने मोबाईल फोन विकसित आणि निर्माण करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी योजना बनविली आहे. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष हरी ओम राय यांनी सांगितले की, उत्पादन डिझाईन करण्याच्या क्षेत्रात आमचे चीनमध्ये जवळपास ६०० ते ६५० कर्मचारी आहेत. आता हे काम आम्ही भारतात हलविले आहे. भारतातील विक्रीच्या गरजा आम्ही स्थानिक प्रकल्पांतून पूर्ण करत आहोत.
आम्ही चीनच्या प्रकल्पातून काही मोबाईल फोनची निर्यात जगभरात करतो. आता हेच काम भारतातून केले जाणार आहे. भारतातील लॉकडाऊन काळात आम्ही जगातील स्मार्टफोन आणि अन् उत्पादनांची मागणी चीनमधून पूर्ण केली आहे. आता माझे स्वप्न आहे की, चीनला मोबाईलची उपकरणे निर्यात करण्यास भाग पाडावे. भारतीय कंपन्या मोबाईल चार्जर आधीपासूनच चीनला निर्यात करत आहेत. केंद्र सरकारने देऊ केलेली प्रोत्साहन योजना यामध्ये मोठी क्रांती घडवेल. यामुळे चीनमधील पूर्ण प्रकल्प आम्ही भारतात आणत आहोत.
महत्वाच्या बातम्या....
एका पॉर्न मॅगझिनने Kim Jong Unचे वाटोळे केले; हुकूमशहा पित्याने दिली मोठी शिक्षा
CoronaVirus बापरे! देश हादरला; कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने चीनलाही टाकले मागे
सज्ज व्हा! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा
सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार