वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 99 लाखांवर गेली आहे. तर आतापर्यंत 4 लाख 96 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. जगभरात यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी कोरोनावरील लसीबाबत एक चिंताजनक वक्तव्य केलं आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात आहे. या संकटाचा सर्वोतोपरी सामना केला जात आहे. अनेक देशांमध्ये कोरोनावरील औषध आणि लस शोधण्यासाठी दिवसरात्र काम केले जात आहे. काही कंपन्यांच्या लस चाचणीच्या अंतिम टप्प्यावर आल्या आहे. मात्र लस विकसित झाली तरी कोरोनाची लागण होणारच नाही, याची खात्री देता येणार नसल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील सीएनएन या वृत्तवाहिनीसोबत बोलताना बिल गेट्स यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जगभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
बिल गेट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाखेर अथवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची लस उपलब्ध होईल. या लसीचे दोन फायदे होणार आहेत. एक तर कोरोनाच्या आजारापासून बचाव करेल आणि दुसरं म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखला जाणार आहे. मात्र, लसीमुळे तुम्हाला कोरोनाची लागण होणारच नाही अशी खात्री देता येणार नाही. तसेच सध्या कोरोना प्रतिबंधक लसीची आवश्यकता आहे. अशावेळी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती, गरोदर महिलांवर चाचणी करण्यासाठी वेळ नाही. अशा परिस्थितीत योग्य, अचूक माहिती संकलित करणे हे कठीण काम असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतील परिस्थितीबाबतही बिल गेट्स यानी चिंता व्यक्त केली. अमेरिकेत कोरोनाच्या चाचण्या अधिक होत असल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचा व्हाइट हाऊसचा दावा अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत एकाच दिवसात सर्वाधिक 37 हजार नवीन रुग्ण आढळले. एकाच दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तसेच बिल गेट्स यांच्या बिल अँड मिलिंडा गेटस फाऊंडेशनच्यावतीने करोनाची लस विकसित करण्यासाठी 40 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 3 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"सत्तेच्या हव्यासापोटी देशात लागू केली आणीबाणी, एका रात्रीत संपूर्ण देशाचा केला तुरुंग"
CoronaVirus News : 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीवर?, WHO ने दिला गंभीर इशारा
बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान