जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तब्बल चार लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा अडीच लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना व्हायरसवर लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.
कोरोनावरील उपचारासंदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. मांजरीमधील संसर्गजन्य आजाराविरोधात वापरण्यात येणाऱ्या औषधामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. GC376 हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत असून प्रयोगशाळेत याबाबत चाचणी देखील करण्यात आली आहे. हे औषध तयार करणाऱ्या कंपनीने अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाकडे माणसांवर या औषधाची चाचणी करण्याची परवानगी मागितली आहे.
संशोधनाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक झांग शुयांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणकीय मॉडेल आणि प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या परीक्षणाच्या आधारे GC376 या औषधाचा परिणाम चांगला असल्याचे आढळले आले आहे. तसेच हे सुरक्षित औषध आहे. हे औषध Sars-CoV-2 च्या महत्त्वाच्या एन्झाइमला बांधून ठेवतं. Mpro असं या एन्झाइमला म्हटलं जात असून एन्झाइममुळे कोरोनाचा संसर्ग होतो. Mpro एन्झाइम प्रोटीनला तोडतात आणि व्हायरस या एमिनो अॅसिडचा वापर ब्लॉक्स तयार करण्यासाठी करतो.
मांजरींवरील हे औषध कोरोनाच्या व्हायरसने बाधित असलेल्या पेशींपर्यंत सहजपणे पोहचू शकतं. कोरोनावर हे अत्यंत प्रभावी ठरत आहे. तसेच माणसांसाठी देखील GC376 हे औषध सुरक्षित असल्याचा दावा चीनच्या संशोधकांकडून करण्यात येत आहे. GC376 हे औषध अमेरिकेतील Anivive Lifesciences कंपनीने तयार केले आहे. हे औषध मांजरीमधील संसर्गजन्य आजारांवर वापरण्यात येते. कोरोनाग्रस्तांवर याचा वापर कधी करण्यात येणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये?
CoronaVirus News : धोक्याची घंटा! कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू
भारीच! Twitter ने लाँच केलं इन्स्टासारखं 'हे' भन्नाट फीचर
अरे व्वा! सिंहांची संख्या वाढली; पंतप्रधानांनी दिली देशवासियांना आनंदाची बातमी
CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा
Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद
भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!
CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च