कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे.कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. अशाच एका नर्सचा व्हिडीओ आता समोर आला आहे. चिलीची राजधानी सेंटियागो मधील El Pino रुग्णालयातील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे. रुग्णसेवा करून ड्युटी संपल्यानंतरही रुग्णालयात थांबून नर्स खास कोरोना रुग्णांसाठी वायोलिन वाजवते. डॅमारीस सिल्व्हा असं या 26 वर्षीय नर्सचं नाव असून ती ड्युटी संपल्यावर रुग्णांना अशा पद्धतीने आनंद देते. त्यांच्यात उत्साह निर्माण करते.
रुग्णालयात सेवा केल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ती हातात वायोलिन घेते आणि ते वाजवत रुग्णालयातील वॉर्डमध्ये फिरते. आठवड्यातून दोन दिवस ती खास रुग्णांसाठी वायोलिन वाजवते. "माझ्या वायोलिनमधून मी या रुग्णांना थोडंसं प्रेम, थोडासा विश्वास आणि थोडी आशा देते. प्रत्येक वेळी मी हे अगदी मनापासून करते. रुग्ण जेव्हा संगीत ऐकतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तेज येतं, ते आनंदी होतात आणि टाळ्या वाजवून दादही देतात. हे पाहून खूप बरं वाटतं, मनाला एक समाधान मिळतं" असं नर्सने म्हटलं आहे.
नर्सचा हा वायोलिन वाजवतानाचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले असून सर्वत्र तिचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 558,091 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एक कोटीहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 12,420,705 वर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"मंदिराच्या समोर आल्यावर फोन करा", डिलिव्हरी पॅकेटवरचा पत्ता पाहून चक्रावून जाल
Vikas Dubey Encounter : "मी समाधानी आहे पण... ", शहीद पोलिसाच्या पत्नीने म्हटलं...
लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल
Vikas Dubey Encounter : "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?"
Vikas Dubey Encounter : "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यांचा हल्लाबोल
Vikas Dubey Encounter : लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं