नवी दिल्ली -चीननेच संपूर्ण जगात कोरोना व्हायरस पसरवला, असा आरोप अनेक बड्या राष्ट्रांनी केली आहे. आता चीनने कोरोना व्हायरससंदर्भात एक सिक्रेट मिशन सुरू केले आहे. संपूर्ण जगात कोरोना पसरवण्याचा आरोप, ज्या चीनवर केला जात आहे. तोच चीन आता लसीच्या शर्यतीत स्वतःला आघाडीव असल्याचे सिद्ध करण्यासाठी एका गुप्त प्लॅनवर काम करत आहे.
एकीकडे कोरोनाने त्रस्त झालेले संपूर्ण जग सुरक्षित कोरोना लस विकसित करण्यासाठी संशोधन, परीक्षण आणि रिपोर्ट तयार करण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे चीनने या प्रकरणातही एक सीक्रेट प्लॅन तयार केला आहे. वृत्त आहे, की चीनने आपल्या सैनिकांसोबत कोरोना व्हायरसच्या एका लसीच्या परीक्षणालाही सुरुवात केली आहे. चीन सरकार आपल्या लष्करातील सैनिकांना मोठ्या प्रमाणावर लस टोचत आहे आणि हे संपूर्ण काम अत्यंत गुप्तपणे सुरू आहे.
परदेशातील एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने गुप्तपणे आपल्या सैनिकांना लस टोचायला सुरुवात केली आहे. फायनान्शिअल टाइम्सने दावा केला आहे, की चीन आपल्या सैनिकांना CanSino ने विकसित केलेली लस टोचत आहे. ही लस तयार करण्यात पीपल्स लिबरेशन आर्मी आणि चीनमधील मेडिकल सायंसच्या प्रमुख चेन वेई यांचे मोठे योगदान आहे. चीनच्या तीनही प्रमुख लसी आता परीक्षणाच्या अॅडव्हान्स्ड स्टेजला आहेत. जाणून घेऊया, या लसींची सद्य स्थिती आणि त्यांच्या समोरील आव्हाने.
चीनची पहिली लस -
- अप्रूव्हल मिळवणारी CanSino पहिली कंपनी.
- चीनी कंपनी CanSino Biologics च्या सुरुवातिच्या परीक्षणाचे परिणाम चांगले होते.
- CanSino ची कोरोना लस सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
- CanSino ची लस इम्यून सिस्टमची शक्ती वाढवत आहे.
- CanSino ची लस ही सर्वसाधारण सर्दी-खोकड्याच्या व्हायरसपासून तयार करण्यात आली आहे.
- आता ही लस मानवावरील परीक्षणाच्या अखेरच्या टप्प्यात आहे.
- UAE मध्ये 5,000 स्वयंसेवकांवर हिचे परीक्षण होणार आहे.
चीनची दुसरी लस
- Sinovac चे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सुरू.
- बिजिंग येथील कंपनी Sinovac चे सुरवातीच्या टप्प्यावरील परिणाम चांगले आले आहेत.
- ही लस निष्क्रिय व्हायरसपासून तयार करण्यात आली आहे.
- जुलै महिन्यात या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणाला ब्राजीलमध्ये सुरुवात झाली आहे.
- Sinovac ची कोरोना लस माकडांवर यशस्वी ठरली आहे.
चीनची तिसरी लस -
- Sinopharm च्या दोन कोरोना लसी.
- चीनची सरकारी कंपनी Sinopharm ने 2 लसी तयार केल्या आहेत.
- या लसी व्हायरसच्या निष्क्रिय पार्टिकल्सपासून तयार करण्यात आल्या आहेत.
- या लसी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अँटीबॉडीज तयार करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
- आता या दोन्ही लसींचे तब्बल 15 हजार लोकांवर परीक्षण केले जाणार आहे.
चीनी लसी समोरील आव्हानं -चिनी लसीच्या परीक्षणासंदर्भात तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे, की ज्या वेगाने लस तयार करण्याचा दावा करण्यात आला आहे, त्या वेगाने काम पूर्ण होऊ शकेल का? चीनने CanSino लस सैनिकांना देण्याची परवानगी दिल्याने तज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत. सायंटिफिक जर्नल 'नेचर'ने चीन सरकारचा हा निर्णय पूर्ण पणे राजकीय आणि अवैज्ञानिक असल्याचे म्हटले आहे.
दावा केला जात आहे, की अशा प्रकारच्या परीक्षणाने लसीच्या परीणामासंदर्भात काहीही स्पष्ट होत नाही. कोणतीही लस परीणामकारक आहे अथवा नाही हे समजण्यासाठी 20,000 ते 40,000 लोकांवर तीचे परीक्षण होणे आवश्यक असते. त्या परीक्षणादरम्यान मिळणाऱ्या डेटाचा अभ्यास करायला अनेकदा अनेक महिने, तर अनेकदा अनेक वर्षेही लागतात. चीनकडे जगभरात रुग्णालयांचे नेटवर्क नाही. तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणासाठीही पुरेसे स्वयंसेवक नाहीत. हे चिनी कंपन्यांसमोरील मोठे आव्हान आहे. यामुळे जगभरातील मोठे वैज्ञानिक चिनी लसीला फार विश्वासार्ह मानत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर
कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम
दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा
CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस