चीनमधून वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 3 कोटींच्या आसपास गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आता अखेर कोरोनावर मात करण्यात चीनला यश आले आहे. चीनने बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनने करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी केलेल्या उपायाबाबतचं सत्य आता जगासमोर आणलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आयलवर्ड पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये गेल्या 20 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कोविड-19 महासाथी दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या पथकासोबत चीनचा दौरा केला होता. तीन महत्त्वाच्या गोष्टींमुळे चीनला करोनाविरोधात मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रूस यांनी चीनने राष्ट्रीय स्तरापासून ते प्रांत आणि शहरांच्या समुदायापर्यंत एक आरोग्य यंत्रणा तयार केल्याचं म्हटलं आहे.
'या' तीन गोष्टींमुळे कोरोनावर मिळवता आलं नियंत्रण
माहिती आणि अनुभव शेअर करणं यामुळे सोपं जातं. या आरोग्य व्यवस्थेने कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चीनच्या लोकांनी या लढाईत आपली वैयक्तिक जबाबदारी ओळखली आणि ती पार पाडली. तसेच कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी चीनच्या अधिकाऱ्यांनी विविध स्तरांवर सजग राहून घेतलेले निर्णय आणि बजावलेले कर्तव्य महत्त्वाचे ठरल्याचं म्हटलं आहे.कोरोनाच्या काळात पारदर्शकपणे काम केल्याचा दावा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केला आहे.
चीनच्या वुहानमध्ये सर्वात आधी सापडला होता रुग्ण
चीनने ठोस पावले उचलल्यामुळे जगभरातील कोट्यवधी जणांचे प्राण वाचले असंही म्हटलं आहे. जिनपिंग यांनी कोरोनाविरोधात चीनच्या प्रशासनाने केलेल्या कार्याचे कौतुक केलं आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला होता. चीनने कोरोनाबाबतची माहिती लपवल्यामुळे जगभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने झाल्याचा आरोप अमेरिका आणि इतर देशांनी केला. मात्र चीनने हे आरोप फेटाळून लावले. कोणतीही माहिती लपवली नसून याउलट अधिक जबाबदारीने आपली भूमिका बजावली असल्याचे चीनने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : "प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नाही", रिसर्चमधून खुलासा
"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"
दिलदार सुपरहिरो! सिम कार्डवर सोनू सूदचं चित्र, अभिनेत्याने दिली भन्नाट रिअॅक्शन
"... तर मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन", ममता बॅनर्जींनी दिलं आव्हान
CoronaVirus News : मोठा निर्णय! 'या' राज्यात मोफत होणार कोरोना चाचणी