कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 303,636 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4,541,184 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,711,966 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना असे काही देश आहेत की जे कोरोनाच्या या संकटात सुरक्षित आहेत. कोरोनाला रोखण्यात जगातील 18 देश यशस्वी झाले असून या देशात कोरोनाचा आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. किरिबाटी, अमेरिकन समोआ, लेसोथो, मार्शल आयर्लंड, मिक्रोनीशिया, नाउरू, पलऊ, समोआ, सोलोमन आयर्लंड, टोंगा, टुवालू, वानुआतू, टोकेलाउ, निउ, द कुक आयर्लंड, सालमन, तुर्केमेनिस्तान आणि उत्तर कोरिया या देशांना कोरोना रोखण्यात यश आले आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाचा प्रसार होत असताना या देशांनी कडक उपाययोजना केल्या. आपल्या देशांच्या सीमा बंद केल्या. तसेच विदेशी नागरिकांना देशात आणि देशातील नागरिकांच्या प्रवासावर देखील बंदी घातली. इतर देशासोबत संपर्क होईल अशा सर्व आंतरराष्ट्रीय सीमाही पूर्णपणे बंद केल्या. यामुळेच ते कोरोनाला रोखण्यात आतापर्यंत यशस्वी झाले आहेत. या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.
कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 86,912 बळी घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 31 हजार 368 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 27 हजार 321वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे 27 हजार 425 जणांचा तर ब्रिटनमध्ये 33 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी
CoronaVirus News : नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर
CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण
CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले...
CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण
CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!