वॉशिंग्टन : आपण कधी विचार केला होता का, की संपूर्ण जग मास्क वापरेल, सर्वजण एकमेकांपासून दोन मिटर अंतरावर राहतील, हे केवळ कोरोना काळामुळेच झाले आहे. अशात सर्वांच्या नजरा कोरोनावरील औषधाकडेच लागलेल्या आहेत. अनेक वैज्ञानिकही सांगत आहेत, की त्यांनी कोरोना व्हॅक्सीन तयार केली आहे. केवळ मानवावर चाचणी होणेच बाकी आहे. असे असतानाच, डब्ल्यूएचओच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, असे वक्तव्य आले आहे, जे सर्वांनाच निराश करू शकते. त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की कोरोना व्हायरसवर सध्या कुठल्याही प्रकारची व्हॅक्सीन तयार होणार नाही.
चीनची भीती! 'या'मुळे आता संपूर्ण जग देतंय भारताच्या पावलावर पाऊल, 'अशी' आखतंय रणनीती
सध्या जगाच्या काना कोपऱ्यातून बातम्या येत आहेत, की कोरोनावरील व्हॅक्सीन ह्यूमन ट्रायलसाठी तयार आहे. असे असतानाच, डब्ल्यूएचओचे कोरोना व्हायरस स्पेशल एनव्हॉय टीमचे डॉक्टर डेव्हिड नेबॅरो यांनी सांगितले, की "कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार झाली आहे, असे सांगणाऱ्या गोष्टींवर आणि दाव्यांवर आपण विश्वास ठेवायला नको."
नवा नकाशा जारी केल्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा भारतावर निशाणा, 'या' भागांवर सांगतायत दावा!
डॉक्टर डेव्हिड म्हणाले, कोरोना व्हायरसवरील वॅक्सीन तयार झाल्यानंतर, ती काही महिन्यांतच संपूर्ण जगातील लोकांवर योग्य पद्धतीने काम करेल आणि रुग्णांचा संसर्गापासून बचाव करेल, हे सध्या शक्यही नाही. इतरही काही व्हायरस आहेत ज्याची नेहमीच भीती आहे. जसे, एचआयव्ही एड्स. आपल्याला आपल्या सवयीत सुधारणा करावी लागेल. तरच आपण याच्यापासून स्वतःला वाचवू शकतो."
CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा
यावेळी डॉक्टर डेव्हिड यांनी, अशी आशाही व्यक्त केली की, कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयारही होऊ शकते. मात्र, त्याला अद्याप फार वेळ लागेल. सध्या सुरू असलेले प्रयत्न पाहता, हे बऱ्याच प्रमाणावर अश्यक्य वाटते, की कोरोना व्हायरसची कुठलीही व्हॅक्सीन जगातील सर्व लोकांवर यशस्वीपणे कार्य करण्यास सक्षण ठरेल, असेही डेव्हिड म्हणाले.
'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी
आयर्लंडमधील डिपार्टमेन्ट ऑफ हेल्थचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रोनन ग्लिन यांनीही, अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "आपल्याला दिर्घकाळ कोरोना व्हायरस सोबतच जगावे लागणार आहे. हे केव्हापर्यंत चालेल हे सांगणे अवघड आहे."