वॉशिंग्टन - जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहे. कोरोनावरील लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. अशातच कोरोना लसीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.
कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅस्ट्राजेनेका (AstraZeneca) ची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याची माहिती दिली आहे.
लसीच्या सर्व चाचण्यांना यश आलं तर ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) चे संशोधक आणि फायजर (Pfizer) यांच्या मदतीने तयार करण्यात आलेली अॅस्ट्राजेनेकाच्या तिसऱ्या टप्प्यात जवळपास 30 हजार लोकांचा समावेश करण्यात आला आहे. "मला सर्वांना सांगताना आनंद होतो की अॅस्ट्राजेनेकाची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे" असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
"जे करणं अशक्य आहे असं म्हटलं जात होतं ते अमेरिकेने करून दाखवलं आहे" असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरात लवकर कोरोना लस विकसित करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर अनेक जण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?
CoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी
झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी! ऑफिसमध्ये काम नाही तर झोपा काढा अन् 1 लाख कमवा
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा?