नवी दिल्ली: संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. आतापर्यंत ३८ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून अडीच लाखपेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावरील लस शोधण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. मात्र अद्याप त्यांना यश आलेलं नाही. त्यातच इस्रायल कोरोनावरील लस तयार करण्याच्या जवळ पोहोचल्याची देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी दिल्यानं जगाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कोरोनाची लस केव्हा येणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असताना इस्रायलमधून आशेचा किरण दिसू लागला आहे. याबद्दल भारतातले इस्रायलचे दूत रॉन माल्का यांनी भाष्य केलं. माल्का यांच्या प्रतिक्रियेमुळे भारताच्यादेखील आशा वाढल्या आहेत.इस्रायलमध्ये कोरोना लसीवर संशोधन सुरू असून ते जवळपास अंतिम टप्प्यात आलं आहे. याबद्दल माल्का यांना पत्रकारांनी माहिती विचारली. त्यावर मीदेखील याची माहिती घेत आहे. लस निर्मितीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र त्या दृष्टीनं आम्ही चांगल्या टप्प्यावर आहोत. कोरोना लस संपूर्ण जगाला देणार का, या प्रश्नालादेखील माल्का यांनी उत्तर दिलं. होय, आम्ही ती लस नक्कीच जगाला देऊ, असं म्हणत माल्का यांनी भारताचा विशेष उल्लेख केला. 'कोरोनामुळे भारत आणि इस्रायल आणखी जवळ आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावे लागणारे खरबरदारीचे उपाय दोन्ही देश एकमेकांना सांगत आहेत. नव्या प्रक्रियांबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण सुरू आहे,' असं माल्का म्हणाले. मंगळवारी (५ मे) इस्रायलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेन्नेट यांनी देशातल्या कोरोना लसीच्या संशोधनाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. 'कोरोना विषाणूला रोखणाऱ्या अँटीबॉडीची निर्मिती करण्याच्या दृष्टीनं इस्रायलला मोठं यश मिळालं आहे,' असं बेन्नेट यांनी सांगितलं.नफ्ताली यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्राएल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च (आयआयबीआर) या महत्त्वपूर्ण संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनत करून मोठं यश मिळवलं आहे. अँटीबॉडीच्या संशोधनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पेटंटची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर लगेच अॅन्टीबॉडीच्या उत्पादनाला प्रारंभ करण्यात येईल.‘‘पंतप्रधान तसेच संरक्षणमंत्र्यांचं या संशोधनावर लक्ष होतं. सरकारचं प्रोत्साहन यासाठी महत्त्वपूर्ण ठरलं. पेटंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधून व्यावसायिक तत्त्वावर या अँटीबॉडीचे उत्पादन सुरू करण्यात येईल,’’ असं यासंदर्भात सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.या अँटीबॉडीची मानवी शरीरावर चाचणी घेण्यात आली की नाही, याबाबत मात्र पत्रकात काहीही माहिती देण्यात आलेली नाही. अशा प्रकारची अँटीबॉडी तयार करण्यासाठी प्रयोगशाळेत दीर्घकाळ संशोधन चालतं. त्यानंतर अनेक चाचण्या घेण्यात येतात. या सर्व प्रक्रियेत खूप वेळ जातो. या दरम्यान अशा अँटीबॉडीच्या साइड इफेक्टवरही संशोधन केलं जातं.इस्रायलचे वैद्यकीय संशोधन अमेरिकेसारख्या प्रगत देशांच्या तोडीस तोड मानलं जातं; पण त्या देशात याबाबत प्रसिद्धीपासून दूर राहणंच पसंत केलं जातं. आता इस्राएलनं अँटीबॉडी शोधली असल्यास याबाबतचे संशोधन तेथे खूप आधीपासून सुरू झालं होतं, असं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलं. जपान, इटली यांसारख्यया बाधित देशांमधून कोरोना विषाणूचे नमुने मोठ्या प्रमाणावर इस्राएलमध्ये मागवण्यात आल्याचं वृत्त इस्रायलमधील माध्यमांनी पूर्वीच दिलं होतं. इस्रायलमध्ये आजवर १६ हजारांवर लोकांना या विषाणूची लागण झाली असून, सुमारे २४० बळी गेले आहेत.मार्चमध्येच लागला होता शोध?इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बॉयलॉजिकल रिसर्च अर्थात आयआयबीआर या संस्थेनं कोरोना विषाणूची जैविक रचना, त्याची वैशिष्ट्यं, रोगनिदान आणि प्रतिबंध करण्याच्या अँटीबॉडीसंदर्भात महत्त्वपूर्ण शोध लावल्याचं वृत्त इस्राएलमधील एका प्रतिष्ठित दैनिकानं मार्चअखेरीस दिलं होतं. मात्र, संरक्षण मंत्रालयानं तेव्हा हे वृत्त फेटाळून लावाताना ‘यासंदर्भात देण्यासारखी माहिती असेल तर ती माध्यमांना नक्कीच पुरवली जाईल,’ असं उत्तर दिलं होतं.
आयआयबीआर ही संस्था इस्राएलच्या संरक्षण विभागाची ‘विज्ञान’विषयक संस्था म्हणून १९५२ मध्ये स्थापन करण्यात आली. नंतर, तिचं नागरी संस्थेत रुपांतर झालं. ही संस्था पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत येत असली, तरी संरक्षण मंत्रालयासोबत तिचा कायम संपर्क असतो.असा निष्प्रभ होणार विषाणूया अँटीबॉडी कोरोना विषाणूवर मोनोक्लोनल पद्धतीनं आक्रमण करतात आणि रुग्णाच्या शरीरातील विषाणूंना निष्प्रभ करून सोडतात. कोरोना विषाणूमधील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रायबोझ न्यूक्लिक अॅसिड म्हणजेच आरएनएला ही अँटीबॉडी कमकुवत करून रुग्णाची या आजारातून सुटका करणार आहे.इस्राएलने शोधली अॅन्टीबॉडी! संशोधन पूर्ण, पेटंट घेऊन उत्पादन सुरू करणारभारतासाठी मोठी बातमी...कोरोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत; वैज्ञानिकांची मोदींना माहितीकोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा