कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 74 लाखांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा चार लाखांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात 37 लाख लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आल्याने त्यांनी लॉकडाऊन थोडा शिथिल केला आहे. मात्र याच दरम्यान कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 100 वर्षांपूर्वी जगात आलेल्या एका महामारीसोबत कोरोनाची तुलना करण्यात आली आहे.
जगप्रसिद्ध मेडिकल जनरल द लँसेटमध्ये आलेल्या एका संशोधन अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. 'अॅक्टिव केस फाइंडिंग विद केस मॅनेजमेंट: द की टू ट्रॅकिंग द COVID-19 पँडमिक' असं या रिसर्चचं नाव आहे. यामध्ये 1918 मध्ये आलेल्या महामारीत जगात कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापेक्षाही कोरोनाची साथ भयानक असल्याचं त्यात म्हटलं आहे. इतर साथीच्या आजारांपेक्षा कोरोना व्हायरस भयंकर आहे. त्याच बरोबर त्याचा मृत्यूदरही जास्त असल्याचं निरिक्षण यामध्ये नोंदविण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे बळी घेतले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 419,373 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 74 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 7,477,428 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 3,791,875 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भारीच! Twitter ने लाँच केलं इन्स्टासारखं 'हे' भन्नाट फीचर
अरे व्वा! सिंहांची संख्या वाढली; पंतप्रधानांनी दिली देशवासियांना आनंदाची बातमी
CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा
Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद
भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!
CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च