जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही जवळपास दोन कोटींच्या वर पोहोचली आहे. तर सात लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 20,024,263 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे 12,898,238 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटनाही समोर येत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी समोर आली आहे.
पीपाई किट घालून आजारी पत्नीची भेट घेणाऱ्या पतीला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये ही घटना घडली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पत्नीची भेट घ्यावी असं पतीला सातत्याने वाटत होतं. तिथे जाण्याचा धोका असतानाही पीपीई किट घालून भेट घेण्याचा पतीने निर्णय घेतला. मात्र त्या भेटीनंतर अवघ्या काही दिवसांतच पतीला देखील कोरोनाची लागण झाली आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
सॅम रेक असं 90 वर्षीय पतीचं नाव असून त्यांच्या 86 वर्षी पत्नी जोएन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र कोरोनामुळे जोएन यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या काही तास आधीच सॅम यांनी आल्या पत्नीची भेट घेतली होती. त्यानंतर ते स्वत:ही कोरोनाचे शिकार झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, भेटीदरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहितीत त्यांच्या मुलीने दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर पत्नीची भेट घेणं महागात पडलं असं वाटतं का? अशा प्रश्न सॅम यांना त्यांच्या मुलाने विचारला होता. त्यावर सॅम यांनी 'अजिबातच असं काही नाही, तिची भेट घेण्याची संधी मिळाली, तिचा हात शेवटच्या क्षणी हातात घेण्यात आला याचा खूप जास्त आनंद' असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या मुलानेच याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनावर मात केल्यावर शिवराज सिंह चौहान करणार प्लाझ्मादान
शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीला बंदी, FSSAI चा मोठा निर्णय
शाब्बास पोरी! सर्व विषयात जबरदस्त गुण पण गणितात मात्र 2, पुनर्तपासणीत मिळाले पैकीच्या पैकी
CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी
"राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचं नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला बनवा", काँग्रेस नेत्याचा सल्ला
माणुसकीला काळीमा! नवजात बाळाला स्मशानभूमीत जिवंत पुरलं, रडण्याचा आला आवाज अन्...