कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 11 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रगत देशही हतबल झाले आहेत. कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. फ्रान्समध्ये तिसरी लाट आली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने रौद्ररुप धारण केलं असून पॅरिसमध्ये पुन्हा एकदा एक महिन्याच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 15 भागांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी याआधी लागू झालेल्या लॉकडाऊनपेक्षा या लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल आहेत असं म्हटलं आहे. तसेच या लॉकडाऊनमध्ये शाळा आणि जीवनावश्यक वस्तुंचे दुकाने सुरू राहणार आहेत. लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी असली तरी सोशल डिस्टेसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करावाच लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत तब्बलं 35,000 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्र्यांनी पॅरिसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. जवळपास ICU मध्ये 1200 रुग्णांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी ICU पूर्ण भरले आहेत. नोव्हेंबरच्या तुलेनेत ही संख्या खूपच जास्त आहे. नवीन निर्देशांनुसार, लोकांना घरातून काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. घराबाहेर पडण्यासाठी आणि व्यायामशाळेत जाण्यासाठी आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय कोणत्याही नागरिकाला आपल्या घरापासून 10 किमीपेक्षा अधिक दूर जाता येणार नाही.
शाळा, विद्यापीठ सुरूच राहणार असून अत्यावश्यक व्यवसाय सुरूच राहणार आहे. फ्रान्समधील गंभीर परिस्थिती पाहता लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेले खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. जगभरातील अनेक देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिकेतील रुग्णांच्या संख्येत देखईल सातत्याने वाढ होत आहे. तर काही ठिकाणी पुन्हा अकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात येत आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.